शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जलाशयावर भरतेय पक्ष्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:47 IST

नवेगावबांध परिसरातील जलाशयावर परदेशी पक्ष्यांची शाळा भरायला सुरूवात झाली असल्याचे आल्हाददायक चित्र आहे.

ठळक मुद्दे सातासमुद्रापलिकडून आगमननिसर्गप्रेमींसाठी पर्वणी

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : थंडीची चाहूल लागताच जिल्ह्यात परदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरूवात होते. नवेगावबांध परिसरातील जलाशय परिसरात विविध प्रजातीचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पक्षी तज्ज्ञ आणि पर्यावरणाप्रेमींसाठी ही एक प्रकारची पर्वणीच असते. मागील पंधरा वीस दिवसांपासून थंडीला सुरूवात झाली असून परदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे नवेगावबांध परिसरातील जलाशयावर परदेशी पक्ष्यांची शाळा भरायला सुरूवात झाली असल्याचे आल्हाददायक चित्र आहे.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल होतात. नोव्हेंबर महिन्यात या पक्ष्यांच्या आगमनास सुरूवात होते. त्यानंतर या पक्ष्यांचा तीन महिने या परिसरात मुक्काम असतो. विविध प्रजातींचे नवनवीन पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांचे हे पक्षी लक्ष वेधून घेतात.नवेगावबांध जलाशयावर मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणे पाहयला मिळतात.नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाची भ्रमंती करायला येणाऱ्या पर्यटकांसाठी पक्षी निरीक्षणाची एक पर्वणीच ठरते. दरवर्षी या परिसरात परदेशी पाहुणे दाखल होत असल्याची माहिती पर्यटकांना असल्याने नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत येथे ठिकाणी दूरदूरवरुन पर्यटक येथे भेट देतात. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला सुध्दा चालना मिळत असून रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. हिवाळ्यात परदेशी पाहुणे सातासमुद्रापलिकडून जिल्ह्यातील तलाव, नदी व इतर पाठवठ्यांवर गर्दी करतात. यावर्षी सुद्धा त्यांच्या आगमनाला सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखरेपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. अर्जुनी-मोरगाव तालुका निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तलावांची संख्या भरपूर आहे. नवेगावबांध, इटियाडोह, सिरेगावबांध हे मोठे तलाव आहेत. नवेगावबांध, नवनीतपूर क्र.१ चा फुटक्या तलाव व भुरसीटोला तलावात लक्षणीय वाढ झाली आहे. विदेशी पक्ष्यांचे आगमन साधारणत: आॅक्टोबर नोव्हेबंर महिन्यात होते. ते ज्या प्रदेशात वावरतात तेथील कडक हिवाळा, बर्फवृष्टी व खाद्यानाची कमतरता यामुळे ते स्थलांतर करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या शोधात ते भारतासारख्या समशितोष्ण प्रदेशात येऊन राहतात. प्रतिकुल परिस्थितीत जगणे, प्रजननातील अडचणी हे सुद्धा स्थलांतराचे कारण मानले जाते. स्थलांतरीत पक्षी युरोप, सायबेरीया, मंगोलिया तसेच हिमालयकडून भारतात प्रवेश करतात. पूर्व विदर्भातील तलावांचा प्रदेश त्यांना अधिक सोयीचा वाटत असल्याने येथील पाणवठे, परदेशी पक्ष्यांनी दरवर्षीच बहरत असतात.खाद्य शोधणारे डब्लिंग डक आणि पाण्यात सूर मारुन खाद्य मिळविणारे डायव्हिंग डक या दोन प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश असतो. परंतु जलाशय व काठावर पक्ष्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या संख्येवर दिवसेंदिवस होत आहे. सध्या नवेगाबांध परिसरातील नवनीतपूर आणि भुरसीटोला परिसरात परदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे.हे पक्षी आढळतात दरवर्षीयेथील विविध पाणवठ्यांवर पिंटलेस, ग्रेलग गुज, कॉमन पोचार्ड, वाईट आय पोचार्ड, युरेशियन विजन, मलार्ड गार्गनी, कोंब डक, लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गनी, युरोप, आशिया, जपान व चीन देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पायपर (छोटी तुतवार), युरोशियन कर्लू, लिटिल स्टिंट, रिंगप्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्राईप, ग्रे हेरान, कोम्बच डक (नाकेर) आदी प्रजातीचे पक्षी या परिसरात दरवर्षी आढळतात.अधिवास नसलेला परिसर अनुकुलमासेमारी व मानवी अधिवास नसलेल्या तलावांना परदेशी पाहुणे अधिक पसंती दर्शवितात. अशा पाठवठ्यांवर पक्षांचे थवेच्या थवे दरवर्षी पाहयला मिळतात.येथे येणाऱ्या पक्ष्यांमध्ये सायबेरियन पक्ष्यांची संख्या अधिक राहत असल्याचे पक्षी निरीक्षकांनी सांगितले.नवेगावबांध परिसरातील भुरसीटोला, नवनीतपूर जलाशयावर सध्या परदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. पुढील दहा पंधरा दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे.- अजय राऊत,प्राध्यापक तथा पक्षी अभ्यासक अर्जुनी मोरगाव.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य