शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

योजनांवर योजना, पण पोट मात्र भुकेले; गोंदियात ३१० कुपोषित बालकांचे विदारक वास्तव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 20:09 IST

कारणे, अडचणींवर आता विचारमंथन सुरू : १५ वर्षांनंतरही प्रशासनाच्या पदरी अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यभरात एक लाख ८२ हजार बालके कुपोषित असल्याचे राज्य सरकारने विधानसभेत मान्य केले आहे. राज्यात पोषण आहारासह अनेक योजना असताना जिल्ह्यात ३१० बालके तीव्र कुपोषित तर १५१५ बालके मध्यम कुपोषित कशी, असा प्रश्न आहे. त्यामुळे यामागील कारणे आणि अडचणी काय यावर, आता विचारमंथन सुरू झाले आहे.

गेल्या १५ वर्षापासून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबत आहे; मात्र आजही कुपोषित बालके आढळून येत आहेत. गर्भावस्थेदरम्यान आरोग्याकडे दुर्लक्ष आणि वैद्यकीय कारणांमुळे कुपोषित बालकांचा जन्म होत आहे. अगदी अलीकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३१० तीव्र आणि १५१५ मध्यम कुपोषित बालके आहेत.

जिल्ह्यात सुमारे एक हजार ७२४ अंगणवाड्या असून, त्यामध्ये तितक्याच सेविका व तितक्याच मदतनीस कार्यरत आहेत. मिनी अंगणवाड्याही आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कुपोषण रोखण्यासाठी यंत्रणा राबवली जाते. दर महिन्याला अंगणवाडीमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी केली जाते. वयाप्रमाणे वजन, उंचीनुसार कुपोषणाची वर्गवारी केली जाते.

बालकांसाठी योजनाकुपोषणामुळे बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी लाखोंचा खर्च होतो. त्यामुळेच आठ-दहा वर्षांत एकाही कुपोषित बालकाचा मृत्यू झालेला नाही.

कुपोषण टाळण्यासाठी

  • सुदृढ गर्भारपण आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार व औषधे घ्यावीत. बाळ जन्मानंतर पहिले सहा महिने स्तनपान अत्यंत गरजेचे आहे.
  • सहा महिन्यांनंतर २ स्तनपानासोबतच घरी बनविलेल्या ताज्या पूरक आहाराची आवश्यकता आहे. तसेच गरजेनुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, वेळोवेळी हिमोग्लोबिनची तपासणी करणे गरजेचे आहे. या सर्व उपाययोजना कुपोषण टाळू शकतात.

आकडेवारी काय सांगते ?तालुका                मध्यम कुपोषित           तीव्र कुपोषितगोंदिया-१                   १३६                         ३३गोंदिया-२                   ३१८                         ३९अर्जुनी-मोरगाव           २४३                         ३८सालेकसा                   ५९                           १९देवरी                         २७३                        ५९सडक-अर्जुनी               ९१                         ३०आमगाव                    १०७                         २१तिरोडा                      २५२                         ४६गोरेगाव                      ३६                          २५एकूण                       १५१५                        ३१०

काही बालकांवर प्रशासनाचे विशेष लक्ष

  • सॅम म्हणजे तीव्र आणि मॅम म्हणजे मध्यम असे वर्गीकरण केले जाते. सॅम वर्गवारीतील बालकांना मृत्यूचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
  • तीव्र कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी गावात ग्राम बालविकास केंद्रे स्थापन केली आहेत. अंगणवाडीच्या माध्यमातून या बालकांना २० दिवस पौष्टिक आहार दिला जातो.
  • १७२४ अंगणवाड्या जिल्ह्यात असून, त्यामध्ये तितक्याच सेविका व तितक्याच मदतनीस कार्यरत आहेत. मिनी अंगणवाड्याही आहेत.
टॅग्स :gondiya-acगोंदिया