शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

२६ लाखांचा सुगंधित गुटखा पकडला; डुग्गीपार पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 11:22 IST

पोलिसांनी २५ लाख ६७ हजार ५८० रुपयांचा गुटखा व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४० लाख ६७ हजार ५८० रुपयांचा माल जप्त केला आहे.

ठळक मुद्देगुटखा व ट्रक असा ४१ लाखांचा माल जप्त

गोंदिया : बंदी असलेला सुगंधित गुटखा अवैधरीत्या घेऊन जात असताना पोलिसांनी, २६ लाख रुपयांचा गुटखा व ट्रक असा एकूण ४१ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. कोहमारा टी-पॉईंट येथे डुग्गीपार पोलिसांनी मंगळवारी (दि.१५) रात्री ही कारवाई केली आहे.

डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वागळे हे सहकाऱ्यांसोबत पेट्रोलींगवर असताना त्यांना ट्रक क्रमांक एमएच ४०- सीडी ८९१० मध्ये सुगंधित गुटखा नागपूरकडे नेला जात असल्याची व ट्रक कोहमारा चौकात उभा आहे, अशी माहिती मिळाली. यावर वांगळे यांनी कोहमारा चौकात जाऊन पाहणी केली असता, ट्रक त्यांना दिसला. त्यांनी ट्रक चालकाला विचारपूस केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यावर वांगळे यांनी ट्रकची पाहणी केली असता, त्यांना मोठ्या प्रमाणात सुगंधीत गुटखा मिळून आला. पोलिसांनी २५ लाख ६७ हजार ५८० रुपयांचा गुटखा व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४० लाख ६७ हजार ५८० रुपयांचा माल जप्त केला आहे.

जप्त केलेल्या गुटखाबाबत भंडारा येथे अन्न सुरक्षा सहायक आयुक्तांना कळविण्यात आले व त्यांनी संपूर्ण मालाची तपासणी केली. प्रकरणी गौरव सुदाम खंडाईत (३४) व मेहूल चंद्रकांत भद्रा (रा.नागपूर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेला मुद्देमाल असा

पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता, त्यात १० पोत्यांमध्ये पानमसालाचे ९० ग्रामचे ३००० पाकीट, सुगंधीत तंबाखू मजा १०८ चे ३० पोत्यांमध्ये २०० ग्रामचे १२०० टीन, सुगंधित तंबाखू इगलचे २० पोत्यांमध्ये २०० ग्रामचे ८०० पाकीट, सुगंधित तंबाखू रिमझिमचे १८ पोत्यांध्ये १००० ग्रामचे ७२० पाकीट, सुगंधीत तंबाखू (मजा १०८) चे १० पोत्यांमध्ये ५०० ग्रामचे १६० टीन, सुंगधीत तंबाखू बागबानचे १० पोत्यांमध्ये ५०० ग्रामचे ३२० टिन असा एकूण २५ लाख ६७ हजार ५८० रुपयांचा माल मिळून आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTobacco Banतंबाखू बंदीgondiya-acगोंदिया