शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

इटखेड्याच्या सरपंच आशा झिलपे अपात्र; अतिक्रमण आले अंगलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:49 IST

Gondia : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तालुक्यातील इटखेडा ग्रामपंचायत सरपंच आशा इंद्रदास झिलपे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून गैरकायदेशीररीत्या शासकीय जमिनीचे ग्रामपंचायत ठरावानुसार फेरफार घेऊन स्वतःच्या व पतीच्या नावाने असलेली अतिक्रमित शासकीय जागा तानाबाई शास्त्रकार या आपल्या आईच्या नावाने केली. मात्र, त्यांनी या जागेवरील अतिक्रमण सोडले नाही. यामुळे अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांनी २५ ऑक्टोबर रोजी आदेश पारित करून, आशा झिलपे यांना सरपंचपदावरून अपात्र ठरविले आहे.

इटखेडा ग्रामपंचायतच्या २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच म्हणून आशा झिलपे या निवडून आल्या होत्या. इटखेडा येथील भरत लीलाधर अनवले यांनी सरपंच आशा झिलपे यांच्या पतीने शासकीय गट क्रमांक ३०८ मध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम १४ (१) (ज-३) नुसार इटखेडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदावरून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने अर्जदार, गैरअर्जदार यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, तलाठी, ग्रामसेवक यांचा अहवाल मागविण्यात आला होता. तलाठी व राजस्व निरीक्षक यांच्या मोका चौकशी अहवालानुसार, ग्रामपंचायत कार्यालयातील दस्तऐवजांमधील गाव नमुना ८ मध्ये सरपंच आशा झिलपे यांची आई तानाबाई शास्त्रकार यांच्या नावाने ३,५०० चौरस फूट खुली जागा अतिक्रमण करून ताबा दर्शविल्यानुसार नोंद घेण्यात आली आहे. ग्रामसेवकाच्या अहवालानुसार सरपंच आशा झिलपे यांची आई तानाबाई शास्त्रकार यांच्या नावाने संबंधित व्यक्तीच्या परवानगीने व ग्रामपंचायत कमिटीच्या संमतीने फेरफार घेण्यात आले आहेत. 

चौकशीत स्पष्ट झाल्याने कारवाई ग्रामपंचायत गाव नमुना ८ नुसार मालमत्ता क्रमांक २५५ ही इंद्रदास लक्ष्मण झिलपे व सरपंच आशा इंद्रदास झिलपे यांचे नावे होती. ग्रामपंचायत सभा ठराव क्रमांक ६/२ दिनांक २३/०२/२०२३ नुसार ग्रामपंचायतीने ठराव घेऊन ही मालमत्ता आशा झिलपे यांची आई तानाबाई शास्त्रकार यांच्या नावाने फेरफार घेतले आहे. सर्व प्रकरणाची शहानिशा करून सरपंच आशा झिलपे यांना सरपंचपद धारण करण्यास अपात्र ठरविण्यात आले. या संबंधीचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांनी २५ ऑक्टोबर रोजी पारित केले आहे. या प्रकरणात अर्जदार भरत अनवले यांची कायदेशीर बाजू अॅड.सी. के. बडे यांनी मांडली, तर सरपंच आशा झिलपे यांच्या वतीने कायदेशीर बाजू अॅड. बी. जी. अवचटे यांनी मांडली.

टॅग्स :gondiya-acगोंदिया