लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेती घाटावरुन रेतीचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांच्या वाहनांवर रेतीमाफीयांनी दगडफेक केल्याची घटना गुरूवारी (दि.६) सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेतीमाफीयांचे जिल्ह्यात प्रस्त वाढत असून त्यांच्या वेळीच मुसक्या आवळण्याची गरज आहे.पर्यावरण विभागाची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेतीचा अवैध उपसा सुरूच असून दररोज गोंदिया शहरासह इतर भागात रेती भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर दिसून येतात. त्यामुळे रेतीची तस्करी जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील तेढवा, काटी, रजेगाव परिसरातील नदीपात्रातून वाळूचा लिलाव झालेला नसतानाही रेतीचा उपसा होत असल्याचे प्रमाण वाढल्याने गोंदिया नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात बुधवारच्या (दि.१०) रात्रीपासून भरारी पथकाने गस्त घालण्यास सुरवात केली. या पथकात तलाठी हटवार, बुचे, भोयर आदींचा समावेश होता. रेती घाटांच्या परिसरात गस्त घालत असताना गुरुवारी (दि.११) सकाळी ६ वाजताच्या सुमारास काटी परिसरातून ३ ट्रॅक्टर हे तेढवा घाटातून वाळूची वाहतूक करताना पकडले.त्या ट्रॅक्टरला पकडल्यानंतर तेढवा येथील घाटावर पथक पोचताच नदीपात्रात असलेल्या ट्रॅक्टर व टिप्परमधील चालक हमाल पळून गेले. त्यानंतर तेथील साहित्य जप्त करुन तलाठी हे वाहनात ठेवत असतानाच हमालांनी व चालकांनी पथकातील अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. यात एका वाहनाचे काचा फोडल्या. तसेच तलाठ्याला सुध्दा मारहाण करण्यास धावले. दरम्यान तलाठ्याने यातून कशी बशी आपली सुटका करुन घेत काटी गावाकडे धाव घेतली. दरम्यान पकडलेले ट्रॅक्टर रावणवाडी पोलीस स्टेशनला आणत असताना ट्रॅक्टर मालकाने त्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. रेतीमाफीयांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून महसूल कर्मचाºयांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे रेतीमाफीयांची हिम्मत नेमकी कशामुळे वाढत आहे. त्यांना नेमके अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळण्याची गरजजिल्ह्यातील सर्वच रेती घाटांवरुन दररोज मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. ही बाब आता लपून राहिलेली नाही. रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी दररोज तीन चार गुन्हे दाखल केले जात आहे. काही ठिकाणी रेतीचा अवैध उपसा होत असताना त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे रेतीमाफीयांची हिम्मत वाढत चालली असून त्यांच्या वेळीच मुसक्या आवळ्याची गरज आहे.मोठ्या रेती घाटांवर २४ तास पथकाची गरजतिरोडा आणि गोंदिया तालुक्यात मोठे रेती घाट आहेत. सर्वाधिक रेतीमाफीये याच भागात सक्रीय आहे. त्यामुळे रेतीच्या अवैध उत्खनन टाळण्यासाठी या ठिकाणी २४ भरारी पथकाची नियुक्ती करण्याची गरज आहे. शिवाय रेती घाटाच्या परिसरात सीसीटीव्ही लावून आणि पोलीस बंदोबस्त ठेवल्यास रेती तस्करांचे मुसक्या आवळणे शक्य होईल.
मोठ्यांना सूट लहानांवर कारवाई४जिल्ह्यात रेतीमाफीयांचे प्रस्त दिवसेंदिवस वाढत आहे. या रेतीमाफीयांना राजकीय वरदहस्त असल्याची बाब सुध्दा आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे मोठ्या रेतीमाफीयांवर कारवाई करण्याचे टाळून लहानांवर कारवाई केली जात असल्याचे चित्र बरेचदा जिल्ह्यात पाहयला मिळाले. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे.