शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

रेती घाटांचे लिलाव होणार मात्र उपसा सप्टेंबरनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंजुरी अभावी यंदा जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया लांबणीवर गेली होती. मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली होती.त्यामुळे घरकुलासह इतर शासकीय आणि खासगी कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर घरकुलासह इतर खासगी बांधकामांची दखल घेत ही कामे करण्यासाठी शासनाने यात काही प्रमाणात शिथिलता देत उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेवून ही कामे करण्याची परवानगी दिली.

ठळक मुद्देजनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण : घरकुल लाभार्थ्यांची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील २८ रेती घाटांचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ जून रोजी जनसुनावणी घेण्यात आली. जनसुनावणीची अहवाल आता राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र रेती घाटांचे लिलाव जरी झाले तरी रेतीघाटांवरुन रेतीचा उपसा हा सप्टेंबर महिन्यानंतरच करता येणार आहे. त्यामुळे याचा जिल्ह्यातील हजारो खासगी बांधकामांना फटका असून घरकुल लाभार्थ्यांना पावसाळा उघड्यावरच काढावा लागणार आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंजुरी अभावी यंदा जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया लांबणीवर गेली होती. मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली होती.त्यामुळे घरकुलासह इतर शासकीय आणि खासगी कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर घरकुलासह इतर खासगी बांधकामांची दखल घेत ही कामे करण्यासाठी शासनाने यात काही प्रमाणात शिथिलता देत उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेवून ही कामे करण्याची परवानगी दिली.मात्र बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती मिळत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांसह खासगी बांधकाम करणाऱ्यांची सुध्दा अडचण झाली.जिल्ह्यातील २८ रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे बांधकामासाठी रेती मिळणे कठीण झाले. त्यातच आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे.त्यामुळे पावसाळ्यात घराचे बांधकाम करायचे कसे असा प्रश्न बांधकाम करणाºयांसमोर निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेती घाटांचे लिलाव करण्यापूर्वी १७ जून रोजी यावर सुनावणी घेतली.त्यामुळे या विभागाकडून सूचना प्राप्त होताच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया जरी पूर्ण झाली तर रेतीचा उपसा मात्र शासनाच्या नियमावली नुसार ३० सप्टेंबरनंतरच करता येणार आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांसह खासगी बांधकामे करणाऱ्या लाभार्थ्यांना चार महिने पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.पोखरलेल्या रेती घाटांचा लिलाव करण्याची पाळीजिल्ह्यातील २८ रेती घाटांचे अद्यापही लिलाव झालेले नाही.तर जिल्ह्यातील सर्वच रेती घाटांवरुन दररोज मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. हे महसूल आणि पोलीस विभागाकडून दररोज करण्यात येत असलेल्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. रेती माफीये अवैधपणे रेतीचा उपसा करीत असल्याने शासनाला या माध्यमातून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या महसुलावर सुध्दा पाणी फेरावे लागत आहे. तर रेतीच्या तस्करीमुळे पोखरलेल्या रेती घाटांचा लिलाव करण्याची वेळ खनिकर्म विभागावर आली आहे.अनेकांचा पावसाळा उघड्यावरचशासनाच्या विविध घरकुल योजनेतंर्गत जिल्ह्यात ३५ हजारावर घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र यापैकी अनेक घरकुलांचे बांधकाम अर्ध्यावरच आहे. बांधकाम पूर्ण करण्यासाठी रेती न मिळाल्याने रखडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना पावसाळा उघड्यावर काढण्याची पाळी आली आहे.रेतीचे दर गगनालारेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरूच आहे. रेती माफीये बांधकाम करणाºयांची गरज लक्षात चोरीच्या रेतीची अतिरिक्त दराने विक्री आहे. सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर दहा ते बारा हजार रुपये आहेत. त्यामुळे रेतीचे दर गगनाला भिडल्याचे चित्र असून यामुळे घरकुल लाभार्थ्यांसह खासगी बांधकाम करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

टॅग्स :sandवाळू