शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

३७ जणांचे नमुने पाठविले तपासणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. मात्र दिल्ली येथील एका धार्मिक समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने सर्व जिल्हा प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देदिल्लीहून प्रवास केलेल्या १४ जणांचा समावेश : रिपोर्टकडे लागले लक्ष, सर्वांना केले रुग्णालयात क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिल्ली येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर देशभर हाय अर्लट देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या कालावधीत दिल्ली निजामुद्दीन येथे गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यापैकी दिल्ली येथे गेलेल्या १४ जणांची ओळख झाली आहे. तर गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या २३ अशा एकूण ३७ जणांना आयुर्वेदीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले. गुरूवारी (दि.२) या सर्वांचे नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले.देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. मात्र दिल्ली येथील एका धार्मिक समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने सर्व जिल्हा प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. या कार्यक्रमाच्या कालावधीत जिल्ह्यातून किती नागरिक दिल्ली निजामुद्दीन येथे गेले होते याचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याच्या सूचना बुधवारी केल्या. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अशांची शोध मोहीम बुधवारपासून सुरू केली आहे. या कार्यक्रमाच्या कालावधीत दिल्ली येथे प्रवास केलेल्या एकूण १४ जणांची ओळख पटली असून या सर्वांना कुडवा परिसरातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.शहरातील गणेश नगर परिसरात एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण २३ जणांना सुध्दा रूग्णालयात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. अशा एकूण ३७ जणांचे नमुने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरूवारी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.या सर्वांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पीएनबीचे ते कर्मचारी झाले होम क्वारंटाईनगोंदिया येथील कोरोना बाधित आढळलेला रुग्ण येथील पीएनबी बँकेत गेला असल्याचे स्पष्ट झाले होते.त्यामुळे बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घेत स्वत:च होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यामुळे जयस्तंभ चौकातील पीएनबीची शाखा १३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.दिल्लीहून प्रवास केलेल्यांचा शोध सुरूदिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले काही नागरिक विविध ठिकाणी रेल्वे गाड्यांनी परत गेले. त्यामुळे या नागरिकांच्या संपर्कात काही प्रवाशी आल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत रेल्वेने प्रवास केलेल्या जिल्ह्यातील अशा प्रवाशांची शोधमोहिम सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.जिल्ह्यात कोरोनाचा नवीन रुग्ण नाहीशहरातील गणेश परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे २७ मार्चला स्पष्ट झाले होते.त्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात युद्ध पातळीवर शोधमोहिम राबविली. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या.त्यामुळेच जिल्ह्यात तेव्हापासून एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या