शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षाच्या मुलीची ६० हजारांत विक्री, आरोपीला चार वर्षांनी अटक; सहा जणांना केले होती आधीच अटक

By अंकुश गुंडावार | Updated: December 9, 2023 20:38 IST

अटक करण्यात आलेला सातवा आरोपी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील २० खोली सुक्लुढाना येथील असून प्रवीण लक्की राजेश बरमैय्या (२७) असे त्याचे नाव आहे.

गोंदिया : शहरात राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलीला भोपाळ येथे ६० हजार रुपयात विक्री करणाऱ्या सात जणांवर गोंदिया शहर पोलिसात २२ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तिला विक्री करण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील सातव्या आरोपीला चार वर्षानंतर ९ डिसेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला सातवा आरोपी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील २० खोली सुक्लुढाना येथील असून प्रवीण लक्की राजेश बरमैय्या (२७) असे त्याचे नाव आहे.

१ डिसेंबर २०१८ ला १३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे नेण्यात आले. तेथे तिची ६० हजारात विक्री करण्यात आली. यासंदर्भात त्या मुलीच्या मामाने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून २२ मार्च २०१९ ला गोंदिया शहर पोलिसांनी सात जणांवर भादंविच्या कलम ३६६ (अ), ३७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पाच आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतरच अटक करण्यात आली होती. परंतु दोन आरोपी फरार होते. या दोनपैकी फरार असलेला आरोपी प्रशांत ऊर्फ चुटकी उमेशचंद पांडे (२८) रा. सुक्लुढाना याला ७ नोव्हेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तर सातवा आरोपी लक्की बरमैय्या (२५) याला ९ डिसेंबर २०२३ ला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, पोलिस हवालदार श्यामकुमार कोरे, सुमित जांगळे यांनी केली आहे.

या प्रकरणात हे आहेत आरोपीसुनीता मेश्राम (३२), निक्की दुर्गेश मेश्राम (३४), आशा अनिल कांबळे (४०), शुभम डेहरीया (२१), जसवंत ठाकूर (२५), प्रशांत पांडे (२८) व लक्की बरमैय्या (२७) यांचा समावेश आहे.

दलालांना मिळते मोठी रक्कमपंजाब, हरयाणा येथे मुलींची संख्या कमी असल्याने तेथील पुरुष मंडळी मुली विकत घेण्यासाठी महाराष्ट्रात येतात. गरिबी व अडचणीचा फायदा घेऊन गरीब मुलींच्या आई-वडिलांना तुमची मुलगी सुखी राहील, असे विविध आमिष देऊन तुमच्या मुलीचे लग्न लावून द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे त्या दलालांच्या शब्दात येऊन परप्रांतातील अनोळखी व्यक्तीच्या हाती अनेक जण आपली मुलगी सोपवितात. ही मुलगी मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात दलाल सक्रिय झाले आहेत. यापूर्वीही असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलगी मिळवून देणाऱ्या दलालांना मोठी रक्कम मिळत असते.

प्रौगंडावस्थेतील मुलींना आमिषपौगंडावस्थेतील मुलींना प्रेमाच्या भूलथापा देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची विक्री परप्रांतात केली जाते. घराबाहेर मुलगा किंवा मुलगी असली तर ते इतके वेळ कुठे होते याची माहिती पालक घेत नाही, त्यामुळे समाजकंटकांना संधी साधण्याची वेळ मिळते. यातूनच असे घृणास्पद प्रकार घडतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस