शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भरधाव ट्रक काळीपिवळीवर कोसळला; तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 9:26 PM

सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा ते पाटेकुर्रादरम्यान असलेल्या भुसारीटोला येथील मुख्य मार्गावर गोंदियाकडून-कोहमाराकडे धावणारा ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ८४८७ व सडक अर्जुनीकडून गोंदियाकडे जाणारी काळी पिवळी एम.एच. ३६, ३१११ ला धडक दिल्याने या काळी पिवळीतील एक जण जागीच ठार तर आठ गंभीर जखमी झाले. त्या आठही जणांना गोंदियाच्या केटीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ गोंदिया ते कोहमारा मार्गावरील भुसारीटोलाजवळ काळी-पिवळी ट्रकची आमरो-समोर धडक झाल्याने काळी पिवळीचा चेंदामेंदा झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.१६) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा ते पाटेकुर्रादरम्यान असलेल्या भुसारीटोला येथील मुख्य मार्गावर गोंदियाकडून-कोहमाराकडे धावणारा ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ८४८७ व सडक अर्जुनीकडून गोंदियाकडे जाणारी काळी पिवळी एम.एच. ३६, ३१११ ला धडक दिल्याने या काळी पिवळीतील एक जण जागीच ठार तर आठ गंभीर जखमी झाले. त्या आठही जणांना गोंदियाच्या केटीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले करण्यात आले. उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात श्याम शंकर बंग (७०) रा. गोरेगाव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात अंबिका गोकूलप्रसाद पांडे (६१) रा. चिरचाळी डव्वा, सुरेश शंकर मुनेश्वर (२४) रा. कालीमाटी, ता. आमगाव अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर असलेल्या सहा जणांवर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगळे, सहायक फौजदार सांदेकर यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी गोंदियाला हलविले.केटीएसला आले छावणीचे रूपभुसारीटोला अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणताच गोंदिया शहरचे ठाणेदार चंद्रप्रकाश सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत व पोलीस अंमलदारांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. आरसीबीचे पथक त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.ओळख पटविण्यासाठी शहर पोलिसांचा खटाटोप- अपघातातील गंभीर जखमी व केटीएसमध्ये उपचारादरम्यान मृत पावलेल्या दोघांची ओळख पटवून घेण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी प्रयत्न केले. गंभीर जखमींच्या फोटो सोशल मीडियावर पाठवून ओळख पटवून घेतली. त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यात पोलिसांना यश आले. दोन गंभीर जखमींना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.

ट्रकचा टायर फुटल्याने बिघडले संतुलनगोंदियावरून कोहमाराकडे धान घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर अचानक फुटल्याने ट्रक चालकाचे संतुलन बिघडले. ट्रक दुसऱ्या बाजूला गेल्याने समोरून येणाऱ्या काळी पिवळीवर धडकला. या अपघातात काळी पिवळीचा चेंदामेंदा झाला. काळी पिवळीचा छत उडाला.यांच्यावर सुरु आहे उपचार- या अपघातात गंभीर जखमी असलेले चालक शाकीर अली अब्दुल अली, वनिता भांडारकर, नवेगावबांध येथील टायगर फोर्समध्ये असलेल्या मनीषा चिखलोंडे, दोन अनोळखी पुरुष असून त्यांची ओळख पटली नाही. तर सहावा गंभीर जखमी प्रनोली सतीश राठोड (१५) रा. भुसारीटोला हा गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात