शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खिडकीतून मंदिरात शिरले अन् देवाचे दागिने पळवून नेले : पोलिसांनी चोराला ठोकल्या बेड्या

By नरेश रहिले | Updated: September 19, 2023 20:40 IST

पांगोली नदीकाठावरील मंदिरात चोरी.

गोंदिया : शहर पोलिस ठाण्याअंतर्गत छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरच्या खिडकीतून आत प्रवेश करून हनुमानाचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपी पंकज मिल्कीराम सूर्यवंशी (२२, रा. मुंडीपार-खुर्द, बटाना) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शहर ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने केली आहे.

छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीच्या काठावर महाकाल देवस्थानातील हनुमान मंदिरात भाविक पूजाअर्चा करण्यासाठी सोमवारी (दि.१८) सकाळी ६ वाजता गेले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसले. या चोरीसंदर्भात भाविकांनी पुजारी स्वप्नील पारधी माहिती दिली. त्यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता चांदीचे मुकुट, छत्र, चांदीचे डोळे ६ नग, चांदीचे मुख, चांदीचे नाक, चांदीचा टिका, चांदीच्या भुवया २ नग, हाताचे कडे २ नग असे एकूण ३५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यासंदर्भात शहर पोलिसांत भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करीत गुन्हे प्रकटीकरण पथकाने पंकज मिल्कीराम सूर्यवंशी याला अटक केली. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, हवालदार जागेश्वर उईके, हवालदार कवलपालसिंग भाटिया, सुदेश टेंभरे, महिला हवालदार रिना चव्हाण, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, दीपक रहांगडाले, शिपाई दिनेश बिसेन, मुकेश रावते, कुणाल चारेवार, अशोक रहांगडाले, सुभाष सोनवाणे यांनी केली आहे.

चोरी केलेली दुचाकीही जप्तपोलिस अधीक्षक पिंगळे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या शहर ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अंमलदारानी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पंकज सूर्यवंशी अटक केली. त्याच्याजवळून चोरी केलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. तसेच चोरी केलेली १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल क्रमांक एमएच ३५- ९९९८ हीसुद्धा जप्त करण्यात आली आहे. अशाप्रकारे दोन गुन्ह्यांतील ५० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तपास हवालदार सुदेश टेंभरे करीत आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदियाTempleमंदिरRobberyचोरी