शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यातील भाजीपाला,मका,टरबूज उत्पादक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या नशिबी कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव सातत्याने येत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देहमीभाव केंद्राचा अभाव : शेतातच सडला शेतमाल, शेतकऱ्यांची सर्वच बाजूने कोंडी

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील जवळपास दीड महिन्यापासून ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी आहे. या ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील भाजीपाला,मका व टरबूज उत्पादकांना बसला असून भाजीपाला आणि टरबूजची विक्री न करता आल्याने त्यांच्या शेतातच हा माल सडला. परिणामी शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च भरुन न निघाल्याने त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. आधीच कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी होवून पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या नशिबी कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव सातत्याने येत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव या भागातील शेतकऱ्यांनी चारपैसे शिल्लक पडावे व जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी टरबुजची वाडी लावली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास १ हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली. सुदैवाने यंदा या सर्वांना पिकांना अनुकुल वातावरण मिळाल्याने त्यांची चांगली वाढ झाली.दरवर्षी लग्नसराईच्या काळात भाजीपाल्यासह काकडीची सुद्धा मोठी मागणी असते. उन्हाळ्याचे ४ महिने टरबूज व डांगरांंची सुद्धा मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपानंतर कुटुंबासह शेतात राबून आणि रक्ताचे पाणी करुन या पिकांची शेती केली. यंदा भाजीपाला, टरबूज व मक्याचे पीक सुद्धा चांगले आले होते. त्यामुळे चार पैसे नक्कीच शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र या सर्वावर ‘लॉकडाऊन’मुळे पाणी फेरल्या गेले. चारपैसे शिल्लक राहणे दूरच राहिले लागवडीसाठी लावलेले पैसे निघाले नाही. सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकरी २०० एकरवर टरबुजाची लागवड करतात. तर काकडीसह भाजीपाला पिकाची जवळपास ५०० एकरवर लागवड केली. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाले असल्याने काकडीला मागणीच नाही. परिणामी ५ एकरातील काकडी शेतातच वाळली. एकीकडे नैसर्गिक संकटाला तोंड देत असताना कोरोनामुळे करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. परिणामी आता खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी ही चिंता सतावित असल्याचे सडक-अर्जुनी तालुक्यातील भागवत चुटे, सुरेश मेश्राम, मोरेश्वर चुटे या शेतकऱ्यांनी सांगितले.‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सोन्यासारखे पीक मातीमोल होत असल्याचे पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू आले. एकंदरीत ‘लॉकडाऊन’मुळे सर्वाधिक नुकसान भाजीपाला व टरबूज उत्पादकांचे झाले आहे.दोन हजार रुपये क्विंटलचा भाव ७०० रुपयांवरअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा १ हजार हेक्टरवर मक्याची लागवड होती. सुदैवाने हे पीक सुद्धा चांगले असून ते आता शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. मात्र अद्यापही हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापारी मक्याची अंत्यत कमी दराने खरेदी करीत आहे. मागील वर्षी मका हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १७५० ते दोन हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळाला होता. मात्र यंदा ‘लॉकडाऊन’मुळे शासकीय हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना ७००-८०० रुपये प्रती क्विंटल दराने मका विक्री करण्याची वेळ आली आहे.धान घरातच पडूनदेशात सर्वत्र २४ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल धान घरात तसाच पडून आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम कसा करावा अशी चिंता त्यांना सतावित आहे.कोकणा परिसरात माझ्यासह अन्य शेतकऱ्यांनी २०० एकरवर टरबूज व डांगराची लागवड केली होती. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे मालाची वाहतूक आणि विक्री करता न आल्याने सर्व टरबूज शेताच पडून राहिल्याने सडले. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देखील नुकसान झाले.- शिवाजी गहाणे, कोकणा (टरबूज उत्पादक शेतकरी)मी ५ एकरवर काकडीची लागवड केली होती. सुदैवाने यंदा काकडीचे पीक चांगले आले होते. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे काकडीला मागणी नसल्याने व वाहतुकीची अडचण आल्याने ५ एकरातील काकडी शेतातच वाळली. त्यामुळे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.- लहू डोंगरवार, रेंगेपार, (काकडी उत्पादक शेतकरी)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी