शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ग्रामसेवकांचे निलंबन मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:27 IST

शेतकरी सन्मान योजनेची कामे न करण्याचा ठपका ठेवत निलंबीत करण्यात आलेल्या ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी युनियनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देग्रामसेवक युनियनचे धरणे आंदोलन : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी सन्मान योजनेची कामे न करण्याचा ठपका ठेवत निलंबीत करण्यात आलेल्या ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी युनियनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची ६४ टक्के कामे करूनही तिरोडा येथील ग्रामसेवकावर सुडबुद्धींनी निलंबनाची कारवाई करण्यात आली.एवढेच नव्हे तर गोंदिया येथील तहसीलदारांमार्फत ६ ग्रामसेवकांनी काम करूनही काम न केल्याचा खोटा अहवाल सादर करण्यात आला.या योजनेत तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक व विविध कार्यकारी सेवा सोसायटी सचिवांची संयुक्त जबाबदारी आहे. मात्र हेतूपुरस्सर ग्रामसेवकांना टार्गेट केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुुळे ग्रामसेवकांमध्ये रोष व्याप्त आहे. यांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात सचिन कुथे, कविता बागडे, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ.के.रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार, परेश्वर यांचा समावेश होता.आजपासून असहकार आंदोलन२२ तारखेपासून ग्रामसेवकांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची कामे केली नाहीत. सोमवारी (दि.२५) करण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर ग्रामसेवक युनियनने निवेदन देत टप्याटप्याने आंदोलन करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला सूचीत केले आहे. यांतर्गत मंगळवारपासून (दि.२६) पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सर्वच प्रकारच्या सभांवर बहिष्कार घालून कोणतेही अहवाल न देता असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.४ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सचिव कामकाज बंद करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या चाब्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (पंचायत) दिल्या जातील. ५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषदेसमोर बेमूदत आंदोलन सुरू करणार असून त्यापुढील आंदोलन राज्यस्तरीय मार्गदर्शनात ठरविले जाणार आहे.