शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

जिल्ह्याला ‘कृषी पर्यटना’चे वेध

By admin | Updated: December 19, 2015 01:43 IST

कित्येक वर्षांपासून धान आणि केवळ धान हे एकमेव पारंपरिक पिक घेत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ...

पीक प्रयोगांना सुरूवात : कारंजातील ‘फार्म’ विविध पिकांनी बहरतेयगोंदिया : कित्येक वर्षांपासून धान आणि केवळ धान हे एकमेव पारंपरिक पिक घेत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्यापुढे विविध पिकांचा पर्याय कृषी विभागाकडून ठेवला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात कोणकोणते पिक यशस्वीपणे घेतले जाऊ शकतात याचे प्रयोग कारंजा येथील कृषी विभागाच्या ३३ एकराच्या शेतावर सुरू आहेत. अत्याधुनिक शेती कशी करायची, याचे उत्तम उदाहरण ठरणारे हे प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत असून कृषी विभागाचे हे शेत ‘कृषी पर्यटना’चे केंद्र ठरत आहे.गोंदिया शहरालगत कारंजा ग्रामपंचायत हद्दीत येत असलेली ३३ एकर जागा कृषी विभागाच्या ताब्यात आहे. अनेक वर्षेपर्यंत या जागेचा योग्य वापरच होत नव्हता. मात्र गेल्या काही वर्षात कृषी विभागाने या जागेवर विविध पिकांचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी हे शेत म्हणजे केवळ पिकांचे प्रयोग करण्याचे ठिकाण न ठेवता शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरणारे ठिकाण व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यांना योग्य ती साथ देऊन त्यावर मेहनत घेण्याचे काम उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड यांन केले. त्यातूनच आज या शेतात डाळींबाची बाग फुलली आहे. ऊसाचे पिक बहरले आहे. सीताफळ आणि मोठ्या बोरांची बाग वाढत आहे. पपईची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत सुरू आहे. केवळ हेच नाही तर मत्स्त्यपालनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र तळे बनविण्यात आले आहे. हौसी पर्यटकांना या तळ्यात आकड्याने मासोळ्या पकडण्याची संधी भविष्यात मिळू शकते.गोंदिया जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि हवामान पाहता या जिल्ह्यात धानासोबत ऊस, पेरू, आंबा ही पिके प्राधान्याने घेतली जाऊ शकतात. पण डाळींबासारखे मोठे उत्पन्न देणारे पिक यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल म्हणून या शेतावर डाळींबाची ५०० झाडं लावणात आली. अवघ्या वर्षभरात ही झाडं चांगली वाढून त्याला डाळींब लागण्यास सुरूवात झाली आहे. वर्षभरापूर्वी लावलेली आंब्याची ९०० झाडे चांगली बहरली आहेत. सीताफळाची ४०० झाडे, बोराची ७५ झाडे, तसेच २.१५ एकरात ऊस लागवड केली आहे. मिरची, ज्वारीचा हुरडा, एवढेच नाही तर छोट्या तलावात शिंगाड्याचेही उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ठिबक सिंचनातून कमी पावसात उन्हाळी धान घेतला जाऊ शकतो याचा यशस्वी प्रयोग येथे करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)