लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातून एकूण १२१ स्वॅब नमुने घेऊन नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १११ स्वॅब नमुन्याचा अहवाल शनिवारपर्यंत (दि.११) जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यात १११ जणांचे स्वॅब नमुने हे निगेटिव्ह आले असून १० नमुन्यांचा अहवाल अद्यापह प्राप्त झालेला नाही.देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशात जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युध्द पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे.त्यामुळेच मागील महिनाभरात जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर दिल्ली निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर देशभरात हायअर्लट देण्यात आला.याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिल्ली निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमा दरम्यान दिल्ली प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना गोंदिया कुडवा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील अलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे.१० एप्रिलपर्यंत एकूण १२१ जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी १११ स्वॅब नमुन्यांचा अहवाल शनिवारीपर्यंत प्राप्त झाला असून हे सर्व नमुने निगेटिव्ह आले. तर १० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह येत असल्याने जिल्हावासीयांना सुध्दा मोठा दिलासा मिळाला आहे.५९ व्यक्ती शासकीय अलगीकरण केंद्रातजिल्ह्यातील २ शासकीय अलगीकरण केंद्रात ५९ व्यक्ती सध्या उपचार घेत आहेत.यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ४९ व लहीटोला १० अशा एकूण ५९ व्यक्तींचा समावेश आहे. तर १० एप्रिल रोजी गोंदिया आयुर्वेदिक कॉलेजमधून २९ नागरिकांना उपचारानंतर सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींवर नजरजिल्ह्यात विदेश प्रवास २५१ व्यक्ती आल्यात. त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. कालावधी जरी संपला असला तरी त्यांनी स्वत:हून अलगीकरणातच राहावे. अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहे. तसेच त्यांची नियमित आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.
१११ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशात जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युध्द पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे.त्यामुळेच मागील महिनाभरात जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर दिल्ली निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर देशभरात हायअर्लट देण्यात आला.
१११ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह
ठळक मुद्दे१० नमुन्यांचा अहवाल अप्राप्त । जिल्हावासीयांना दिलासा