शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून निराधार योजनेचे मानधन रखडले; गरीब लाभार्थ्यांनी दिवाळी कशी करावी साजरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:09 IST

दिवाळीपूर्वी मानधन जमा होणार का : नारिधार लाभार्थीचे लागले आहे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क बाराभाटी : निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या जुलै महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दिवाळीचा सण तोंडावर आहे. त्यामुळे निराधारांची दिवाळी ही अंधारात जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुपाशी व निराधार योजनेचे लाभार्थी उपाशी या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे. राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच लाभार्थ्यांचे मानधन महिन्याकाठी देण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.

निराधार योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्त्या, संजय गांधी निराधार, घटस्फोटीत, वयोवृद्ध अशा लाभार्थ्यांचा समावेश आहे. शासनाकडून मिळणारे या योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील चार महिन्यांपासून रखडले आहे. लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून तातडीने दर महिन्याला मानधन दिले जाते. परंतु, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाअभावी शासनाने अडचणीत आणले आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन, या योजनांचा तालुक्यातील अनेक निराधार लाभार्थी लाभ घेत आहेत. ज्यांना चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही, अशा लाभार्थ्यांनी काय करावे? कसे जीवन जगावे? कशाप्रकारे आपल्या औषधांची सोय करावी? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. 

तहसील कार्यालय व बँकेच्या माराव्या लागतात चकरा शासनाचे व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. निराधार योजनेचे लाभार्थी हे मानधनासाठी तहसील कार्यालय व बँकेत मानधन जमा झाले का? याची विचारणा करण्यासाठी दररोज पायपीट करत आहेत. पण गेल्या चार महिन्यांपासून त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.

"मला जुलै महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे औषधपाण्याचा खर्च कुठून करायचा. दिवाळीचा सण तोंडावर असून, मानधन जमा न झाल्यास र्ता देखील अंधारातच जाण्याची शक्यता आहे." - रवींद्र तागडे, निराधार योजना लाभार्थी, येरंडी- बाराभाटी

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना