शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

आरटीपीसीआर चाचण्या कमी करणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 5:00 AM

कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. तसेच चाचण्याचे प्रमाण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींग करुन उपचार करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा चढता ग्राफ खाली आणून जिल्हा कोरोनामुक्त करणे हा मागील हेतू आहे. पण आरोग्य विभागातील काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांच्या निदर्शनात आली.

ठळक मुद्देवैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा : चाचण्या वाढविण्यावर भर द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील नवेगावबांध, गोरेगाव, सालेकसा या ग्रामीण रुग्णालयात मागील आठ दहा दिवसात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी केले होते. मात्र यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकाराता येत ही गंभीर बाब हेरून जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी तीन वैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. तसेच चाचण्याचे प्रमाण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींग करुन उपचार करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा चढता ग्राफ खाली आणून जिल्हा कोरोनामुक्त करणे हा मागील हेतू आहे. पण आरोग्य विभागातील काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांच्या निदर्शनात आली. नवेगावबांध, गोरेगाव, सालेकसा या ग्रामीण रुग्णालयात मागील काही दिवसात आरटीपीआर टेस्ट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून यामुळे एकाचवेळी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या काही ग्रामीण रुग्णालयात केवळ ५ ते ७ आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहे. हे प्रमाण फारच कमी असून याकडे काही वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. मात्र यापुढे यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. तसेच चाचण्याचे प्रमाण कमी असल्याप्रकरणी नवेगावबांध, सालेकसा, गोरेगाव या तीन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून आठ दिवसात यावर उत्तर मागविले आहे. तसेच इतर वैद्यकीय अधीक्षकांना आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना केल्या आहे.त्रिसूत्रीचा अवलंब कराकोरोनाचा संसर्ग आटोक्यात हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून सर्व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी लक्ष द्यावे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करुन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.इतर आजाराच्या रुग्णांकडे लक्ष द्याकोरोना संक्रमण काळात इतर आजाराच्या रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन गर्भवती महिला, मधूमेह रुग्ण, ह्दयरुग्ण, उच्च रक्तदाब आदी रुग्णांचे देखील कोविड टेस्टींग करावी. ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांकडे सुध्दा लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या