रेकॉर्ड ब्रेक २८५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:00 AM2020-09-17T05:00:00+5:302020-09-17T05:00:14+5:30

बुधवारी आढळून आलेल्या २८५ कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १७९ रूग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया तालुक्यात २२४६, तिरोडा ५७३, गोरेगाव १३९, आमगाव २६२, सालेकसा १०५, देवरी १६७, सडक-अर्जुनी ११२, अर्जुनी-मोरगाव १६२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले ७४ रुग्ण असे एकूण ३८४० रुग्ण बाधित आढळले आहे.

Record break 285 new positive patients | रेकॉर्ड ब्रेक २८५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रेकॉर्ड ब्रेक २८५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

Next
ठळक मुद्दे३८५ रुग्ण औषधोपचारातून बरे : एका बाधित रुग्णाचा मृत्यू, गोंदिया नंतर आता तिरोडातही जनता कर्फ्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात मोठया प्रमाणात वाढत असतानाच बुधवारी (दि.१६) आतापर्यंतचे सर्वाधिक २८५ नवे रूग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी अधिकच गंभीर बाब ठरत आहे. मात्र यासोबतच तब्बल ३८५ कोरोना बाधित रुग्ण औषधोपचारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हयात आतापर्यंत २२६६ रुग्णांनी मात केली आहे. आता रूग्ण संख्या ३८४० झाली आहे. तर क्रियाशील रूग्णसंख्या १५१८ झाली असून एकूण ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून २५८० नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून १३८६ नमुने असे एकूण ३९६६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
बुधवारी आढळून आलेल्या २८५ कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १७९ रूग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया तालुक्यात २२४६, तिरोडा ५७३, गोरेगाव १३९, आमगाव २६२, सालेकसा १०५, देवरी १६७, सडक-अर्जुनी ११२, अर्जुनी-मोरगाव १६२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले ७४ रुग्ण असे एकूण ३८४० रुग्ण बाधित आढळले आहे. तर ज्या ३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३२७, तिरोडा २०, गोरेगाव १२, आमगाव ५, सालेकसा ३, देवरी तालुका १०, सडक-अर्जुनी ५ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत २२६६ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १३८६, तिरोडा ३४२, गोरेगाव ६४, आमगाव १४१, सालेकसा ६०, देवरी ७७, सडक-अर्जुनी ७९, अर्जुनी-मोरगाव १०९ आणि इतर ८ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १५१८ झाली असून तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात ८३१, तिरोडा २१९, गोरेगाव ७४, आमगाव ११६, सालेकसा ४४, देवरी ९०, सडक-अर्जुनी ३०, अर्जुनी-मोरगाव ५२ आणि इतर ६२ रूग्ण आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बघता जनता कर्फ्यूसाठी व्यापारी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

७६६ रूग्ण घरीच अलगीकरणात
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ७६६ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील ५४५, तिरोडा ३७, गोरेगाव ३७, आमगाव ४१, सालेकसा ६, देवरी ५७, सडक-अर्जुनी २८, अर्जुनी-मोरगाव १५ व इतर ०० असे एकूण ७६६ क्रियाशील रुग्ण घरीच अलगीकरणात आहे.
तिरोडा येथे रविवारपर्यंत बंद
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता तिरोडा येथील व्यापारी संघटनांनी गुरूवारपर्यंत (दि.१७) जनता कर्फ्यू पुकारला होता. मात्र कोरोनाची स्थिती काही आटोक्यात आली नसल्याने संघटनेच्यावतीने बुधवारी (दि.१६) नगर परिषदेला पत्र देत पुन्हा शुक्रवार (दि.१८) ते रविवारपर्यंत (दि.२०) बंद ठेवण्याचे विनंती पत्र दिले आहे. त्यानुसार, शुक्रवार ते रविवारपर्यंत (दि.२०) बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी पत्र काढले आहे.
गोंदियात बंदला संमिश्र प्रतिसाद
येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी रविवारपासून (दि.१३) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकानी बंद असतानाच काही व्यापारी आपल्या दुकानी उघडत असल्याचे दिसत आहे. मात्र बंदमुळे बाजारपेठेत एरवी दिसून येणारी गर्दी एकदमच कमी झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या दृष्टीने हे नक्कीच कोठेतरी फायद्याचे ठरणार यात शंका नाही.
जिल्ह्यात ५६ रूग्णांचा मृत्यू
जिल्हयात आतापर्यंत ५६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुक्यीतल २९, तिरोडा १२, गोरेगाव १, आमगाव ५, सालेकसा १, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ व इतर ठिकाणच्या ४ रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Record break 285 new positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.