शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

बलात्कारी पाहुण्याला ३२ वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

प्रवीण परसराम कुसराम (२३, रा. भजेपार, ता. सालेकसा) असे आरोपीचे नाव आहे. १२ नोव्हेंबर २०१८ ला आरोपी हा पीडितेच्या घरी पाहुणा म्हणून आला होता.  त्याला मार्केटमध्ये मटण घेण्यासाठी पाठविले असता, आरोपीने पीडित मुलीला बाजारात घेऊन जातो म्हणून पीडितेला सोबत घेऊन मोटारसायकलने बाजारात न जाता रस्त्यात झुडपी जंगलात नेऊन त्या मुलीवर  नैसगिक व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देवरी तालुक्यात १३ नोव्हेंबर २०१८ ला पाहुणा म्हणून आलेल्या नराधमाला मटण आणण्यासाठी मुलीच्या आईने पाठविले. मटण घेण्यासाठी जाताना तो ११ वर्षीय मुलीला बाजारात घेऊन गेला. परंतु त्याने तिला बाजारात न नेता रस्त्यातील झुडपी जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारी आरोपीला प्रमुख जिल्हा विशेष सत्र न्यायाधीशांनी ३२ वर्षे सश्रम कारावास व  १ लाख २ हजार रुपये दंड ठोठावला. ही सुनावणी ३० मे रोजी करण्यात आली. प्रवीण परसराम कुसराम (२३, रा. भजेपार, ता. सालेकसा) असे आरोपीचे नाव आहे. १२ नोव्हेंबर २०१८ ला आरोपी हा पीडितेच्या घरी पाहुणा म्हणून आला होता.  त्याला मार्केटमध्ये मटण घेण्यासाठी पाठविले असता, आरोपीने पीडित मुलीला बाजारात घेऊन जातो म्हणून पीडितेला सोबत घेऊन मोटारसायकलने बाजारात न जाता रस्त्यात झुडपी जंगलात नेऊन त्या मुलीवर  नैसगिक व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. हे प्रकरण कुणालाही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी मुलीला दिली. आरोपीने तिला घरी सोडून स्वत:च्या गावी पळून गेला. यासंदर्भात १३ नोव्हेंबर  रोजी देवरी येथे आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार पाटील यांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (अ) (ब),  ३७७, ५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६, ८ अंतर्गत तपास केला. या प्रकरणात  अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सतीश यू. घोडे व विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकूण ९ साक्षीदारांची न्यायालयासमोर साक्ष नोंदविली.

अशी सुनावली आरोपीला शिक्षा - या आधारावर  प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी आरोपीविरुद्ध सरकारी पक्षाचा कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल, रासायनिक परीक्षण अहवाल व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीला भादंवि कलम ३७६ अ, ब अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्षांचा अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ३७७ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्षांचा अतिरिक्त सश्रम कारावास,  कलम ५०६ अंतर्गत २ वर्षांचा सश्रम कारावास व  २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावास, अशी एकूण ३२ वर्षे सश्रम कारावासाची व  १ लाख २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

दंडाची रक्कम पीडितेस- मनोधैर्य योजनेंतर्गत पीडितेच्या वैद्यकीय उपचार व पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला योग्य साहाय्य करण्यासाठी आदेश केले आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगणजुडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक ब्रिजलाल राऊत यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग