८ हजार बौद्ध बांधवांना रमाईचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:41 AM2019-01-16T00:41:09+5:302019-01-16T00:41:39+5:30

बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या नवबौध्दांना पक्के घर देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाद्वारे रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार बौध्द बांधवांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

Ramai support for 8 thousand Buddhist brothers | ८ हजार बौद्ध बांधवांना रमाईचा आधार

८ हजार बौद्ध बांधवांना रमाईचा आधार

Next
ठळक मुद्दे२४८१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता : घरकुल अधिक मागणी कमी

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या नवबौध्दांना पक्के घर देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाद्वारे रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार बौध्द बांधवांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी रमाई आवास योजनेच्या घरांची संख्या मोठी आहे. परंतु घर मागणी करणाºयांची संख्या कमी असल्याची माहिती पुढे आली आहे.
रमाई आवास योजनेतून पक्के घर देण्यासाठी सन २०१७-१८ या वर्षात ५ हजार घरे मंजूर करण्यात आली. त्यातील २ हजार ८८४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यातील २ हजार ४८१ लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. ५ हजार घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. गोंदिया तालुक्यासाठी १११९ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ४६७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. गोरेगाव तालुक्यासाठी ५१५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ३६८ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी ७९६ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ५५६ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यासाठी ५९३ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ४७७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.
देवरी तालुक्यातील ८३० घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.४०१ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. तिरोडा तालुक्यासाठी ५६५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.२५३ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. आमगाव तालुक्यासाठी ३६१ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. १५८ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.
सालेकसा तालुक्यासाठी २२१ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. १७७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. एकूण जिल्ह्यासाठी ५ हजार घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. २ हजार ८५७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.
 

Web Title: Ramai support for 8 thousand Buddhist brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.