मजुरांना कामावर दाखवून पैशांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:52 PM2019-08-18T23:52:13+5:302019-08-18T23:52:47+5:30

मजूर कामावर हजर नसताना त्यांना कामावर हजर असल्याचे दाखवून पैशांची उचल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील ग्राम राका येथील ग्रामपंचायतमधील हा प्रकार असून सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Raise money by showing laborers | मजुरांना कामावर दाखवून पैशांची उचल

मजुरांना कामावर दाखवून पैशांची उचल

Next
ठळक मुद्देराका ग्रामपंचायतमधील प्रकार : गावकऱ्यांचा कुलूप ठोकण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : मजूर कामावर हजर नसताना त्यांना कामावर हजर असल्याचे दाखवून पैशांची उचल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील ग्राम राका येथील ग्रामपंचायतमधील हा प्रकार असून सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
राका या गावात गट ग्रामपंचायत असून लोकसंख्या ३१०३ आहे. गावच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे सुरू करण्यात आली. पण त्या कामांवर मजूर हजर नसताना त्या मजुरांची हजेरी लावून सचिव होमेंद्र शहारे, सरपंच चादेवार व रोजगार सेवक अशोक चांदेवार यांनी संगणमत करून त्या बोगस मजुरांच्या माध्यमातून पैशांची उचल केली. याबाबतची तक्र ार ग्रामपंचायत सदस्य जनार्दन शालिकराम मेंढे यांनी तक्रार केली आहे.
गावातील तलाव खोलीकरण, महादेव बोडी खोलीकरण, पांदन रस्ता, शिताबाई ते महादेव चांदेवार यांच्या शेतातील पांदन रस्ता आदी कामांवर बोगस मजुरांच्या माध्यमातून पैशांची उचल केल्याची माहिती पुढे आली आहे. राका गावकºयांनी याबाबत खंड विकास अधिकारी व जिल्हा परिषदेकडे गेल्या आठ दिवसांपूर्वी तक्रार दिली. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. अशात येत्या सात दिवसांत सरपंच, सचिव व रोजगार सेवकावर कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा ईशारा गावकºयांनी लेखी निवेदनातून दिला आहे.

राका ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामावर आलेल्या मजुरांच्या खात्यावर पेमेंट पाठविण्यात आले. यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही व बोगस मजूर लावण्यात आले नाही.
-होमेंद्र शहारे, सचिव, ग्रामपंचायत राका

Web Title: Raise money by showing laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.