शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अवकाळी पावसाने लाखो क्विंटल धान भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात रिमझिम पाऊस सुरूच होता. आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया,अर्जुनी मोरगाव,सालेकसा तालुक्यात पाऊस झाल्याने याचा धानाची मळणी करीत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : शासकीय धान खरेदी, पाखड धानाची समस्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गुरूवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल धान भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकºयांना धानाची विक्री करण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांवर असमानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७२ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात रिमझिम पाऊस सुरूच होता. आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया,अर्जुनी मोरगाव,सालेकसा तालुक्यात पाऊस झाल्याने याचा धानाची मळणी करीत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे धान खरेदी केंद्र आहेत. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा धान विक्रीसाठी पडून आहे. आदिवासी विकास महामंडळाचा खरेदी केलेला संपूर्ण ४ लाख क्विंटल धान उघड्यावर असून याला अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे धान भिजल्याने ते पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ८ लाख क्विंटल धान खरेदी केला असून यापैकी काही धान गोदामात तर काही धान ताडपत्र्या झाकून केंद्रावर पडला आहे. चार दिवसांपूर्वी सरकारने धानाच्या हमीभावात दोनशे रुपये प्रती क्विटंल दर वाढविल्याने शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. शेकडो शेतकऱ्यांच्या धानाचा काटा न झाल्याने ते खरेदी केंद्राच्या आवारात तसेच पडून आहे.दरम्यान गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे धान घेत ताडपत्र्या झाकून धानाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्रावर शेतकरी पोहचेपर्यंत धानाचे पोते ओले झाल्याने शेतकºयांना नुकसान सहन करावे लागले. आमगाव तालुक्यातील कट्टीपार, कालीमाटी, सुपलीपार, गोरठा आणि तिगाव या धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान ओले झाले. त्यामुळे हे वाळविल्याशिवाय विकता येणार नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.रब्बी पिकांना फटकाजिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात काही प्रमाणात भाजीपाला पिकांचा देखील समावेश आहे.अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे.केंद्र संचालकांचे जीआरवर बोटशासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांचा धानाचा काटा न झाल्यास ते धान केंद्रावर उघड्यावर पडून असल्यासमुळे भिजल्यास अथवा चोरीला गेल्यास यासाठी खरेदी केंद्र व शासन जबाबदार राहणार नाही, असे शासनाच्या जीआरमध्ये नमूद आहे.सध्या सर्वच केंद्रावर शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटल धानाचा काटा व्हायचा आहे. पावसामुळे हे धान भिजून नुकसान झाले असून याची कुठलीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.खरेदी केंद्रावर ताडपत्र्यांचा तुटवडाशासकीय धान खरेदी व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. तर पावसापासून धानाचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्र्यांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. पण अनेक धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्यांचा तुटवडा होता. तर काही केंद्रावर फाटलेल्या ताडपत्र्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या समस्येत वाढगुरूवारी जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे धान भिजल्याने ते पाखड झाले. पाखड झालेले धान खरेदी केले जात नसल्याने हे धान मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कोंडीजिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा धानाचा काटा आठ आठ दिवस होत नसल्याने शेतकऱ्यांना धानाची राखन करीत केंद्रावर राहावे लागत आहे. त्यातच गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान सहन करावे लागले. याची नुकसान भरपाई सुध्दा शासनाकडून मिळणार नसल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी केली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी