लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाले भरुन वाहत आहेत. तर बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गोरेगाव तालुक्यातील मोहाडी आणि तिगाव या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेशातही पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे ३ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले.रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात कायम होता.त्यामुळे नदी नाले भरुन वाहत असून सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २५.८७ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला. गोरगाव तालुक्यातील मोहाडी ७४.४० आणि तिगाव येथे ७६.८० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे तीन दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहे. तर इटियाडोह धरण शंभर टक्के भरले असून त्यामुळे २० से.मी.पाण्याचा विर्सग सुरू होता.पावसामुळे पिकांना सुध्दा संजीवनी मिळाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काही घरांची सुध्दा पडझड झाली असून महसूल विभागाने सर्वेक्षणास सुरुवात केली आहे.
दोन महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST
रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात कायम होता.त्यामुळे नदी नाले भरुन वाहत असून सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २५.८७ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
दोन महसूल मंडळात अतिवृष्टी
ठळक मुद्देपुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले : सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ