शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२७ व २८ तारखेला जिल्ह्यात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:59 IST

Gondia : जिल्ह्यात ढगाळ वातावरणाने थंडी गायब

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील आठवड्यात जिल्ह्यात थंडीने चांगलाच कहर केला होता व किमान तापमान थेट ७.२ अंशांपर्यंत आले होते. मात्र, आता जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, पावसाळा सुरू झाल्यासारखे वाटू लागले आहे. यामुळे मात्र पारा वरवर चढत असून, मंगळवारी (दि. २४) किमान तापमान १५.३ अंशांवर पोहोचले होते. अशातच आता हवामान खात्याने २७ व २८ तारखेला पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

यंदा उन्हाळा व पावसाळा आपल्याच तालात राहिला व त्यांना समजून घेता आले नाही. जून महिन्यापर्यंत उन्हाळ्याने घाम फोडला, तर दिवाळीपर्यंत पावसाचा लहरीपणा जाणवला. अशात आता हिवाळाही दररोज आपले रंग बदलताना दिसत आहे. यंदा दिवाळी आटोपल्यानंतर थंडीने थोडाफार जोर दाखविला. तर मागील आठवड्यात थंडीने चांगलाच कहर केला होता. जिल्ह्याचे किमान तापमान तब्बल ७.२ अंशांपर्यंत पडले होते. थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. तर त्यानंतर आता ढग दाटून आले आहेत. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे आता थंडी गायब झाली असून, तापमान १५.३ अंशांवर पोहोचले आहे.

हवामान बघून नियोजन करामागील आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, हीच स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. अशातच हवामान खात्याने २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अशात शेतकऱ्यांनी कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवावे आणि त्यानु‌सार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसgondiya-acगोंदिया