रेड झोनमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:35+5:30

सध्या सर्वत्र कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढ आहे. त्यातच मागील ३९ दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांपासून कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यास सुरुवात केली आहे.

Quarantine those coming from the red zone | रेड झोनमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन करा

रेड झोनमधून येणाऱ्यांना क्वारंटाईन करा

Next
ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांनी काढले फर्मान : कक्षाचे फोटोही मागविले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर याचा फटका बसताच आता प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. गटविकास अधिकाºयांनी मंगळवारी यासंदर्भात एक पत्रक काढून रेड झोनमधून येणाºया नागरिकांना गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढ आहे. त्यातच मागील ३९ दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांपासून कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी गावात रेड झोनमधून येणाºया नागरिकांना गावातील जि.प.व खासगी शाळा, वसतिगृृह इमारतींमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्याची व्यवस्था करण्याची निर्देश दिले आहे. क्वारंटाईन कक्षाच्या ठिकाणी वीज,
पाणी, आंघोळीकरिता लागणारे पाणी, शौचालयाची व्यवस्था असेल अशा इमारतीची निवड करावी. तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांनाच्या जेवणाची व राहण्याकरिता लागणाºया साहित्याची व्यवस्था ही कुटुंबातील व्यक्ती करतील असे निर्देश दिले आहे.

क्वारंटाईन कक्षाचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर
जिल्ह्यात बाहेरुन येणाºया स्थलांतरित मजुरांकडे दुर्लक्ष करणे प्रशासनाला भोवल्यानंतर आता उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. गाव स्तरावर क्वारंटाईन कक्ष स्थापन करुन रेड झोनमधून येणाºया त्या कक्षात ठेवण्याचे निर्देश सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांना दिले आहे. तसेच क्वारंटाईन कक्ष स्थापन केल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉटसअ‍ॅपवर पाठविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

Web Title: Quarantine those coming from the red zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.