शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नियमभंग करणाऱ्यांना दंडाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही कारभार चालविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे होते.

ठळक मुद्देनगर परिषद पथकाची नजर : २९२ जणांवर पथकाने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता देत शासनाने काही नियमांतर्गत दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली. त्यानुसार शहरातील बाजारपेठ उघडली असून मात्र नागरिक व व्यापाऱ्यांना नियमांना बगल दिली जात आहे. अशा नागरिक व व्यापाºयांवर नजर ठेवण्यासाठी नगर परिषदेने विशेष पथकांचे गठन केले आहे. या पथकांनी आजवर २९२ नागरिक व व्यापाऱ्यांना दणका देत त्यांच्याकडून ४३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, हे पथक बाजारपेठ व शहरावर नजर ठेवून असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. कोरोनामुळे ‘न भूतो न भविष्यती’ अशी स्थिती अवघ्या जगापुढे निर्माण झाली आहे.कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही कारभार चालविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे होते. अशात राज्य शासनाने ‘लॉकडाऊन’ शिथिल करीत दैनंदिन व्यवहारांना परवानगी दिली असून यासाठी काही नियम ठरवून देण्यात आहेत.मात्र शहरातील बाजारपेठेत बघता व्यापारी व नागरिक दोघांकडूनच नियमांना तिलांजली देत वागणे सुरू आहे. यावरून शिथिलतेचा अर्थ यांनी संपूर्ण सुटका असा समजून घेतल्यासारखे वाटत आहे.या सर्व व्यवहारांवर नजर ठेवणे गरजेचे असून अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची पाळी येऊ नये यासाठी नगर परिषदेने ३ विशेष पथकांचे गठन करून बाजारपेठेतील व्यवहारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.त्यानुसार, हे पथक १९ मे पासून कार्य करीत असून आजवर २९२ जणांना दंडाचा दणका देत त्यांच्याकडून ४३ हजार रूपये या पथकाने वसूल केले आहेत. दुकानदारांना ग्राहकांची गर्दी करून घेऊ नये, ग्राहकांनी मास्क लावणे, त्यांना हँडवॉश किंवा सॅनिटायजर पुरविणे, शारिरिक अंतर ठेवणे, नोंद घेणे आदि नियमांतर्गत काम करावयाचे आहे.तर नागरिकांनाही स्वत:ची सुरक्षा लक्षात घेत निघायचे आहे. मात्र व्यापारी व नागरिक दोघांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने पथक बारीक नजर ठेऊन आहे.पथकाने अशा केल्या कारवायापथकाने केलेल्या कारवायांत मास्क न लावणाऱ्या २८० जणांना प्रत्येकी १०० रूपये दंड ठोठावला असून २८ हजार रूपये वसूल केले आहेत. शारीरिक अंतर पाळता ग्राहकांची गर्दी करणाºया ९ दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रूपये दंड ठोठावला असून नऊ हजार रूपये वसूल केले आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५०० रूपये दंड ठोठावला असून त्यांच्याकडून एक हजार रूपये तर होम क्वारंटाईन करण्यात आले असतानाही बाहेर फिरत असलेल्या एकाला एक हजार रूपयांचा दंड ठोठावला असून अशा एकूण २९२ कारवायांत ४३ हजार रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती लेखाधिकारी व पथक प्रमुख अविनाश फोफाटे यांनी सांगीतले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या