शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

जनजागृती व दक्षता ही महत्त्वाची शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:00 AM

यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पुर परिस्थिती असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन कार्य करावे. शोध व बचाव कामात जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांच्या रंगीत तालमेचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तींवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे, मान्सून पूर्व तयारीची रंगीत तालिम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपत्ती कधी सांगून येत नसून तिचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण व जनजागृती या आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्तीच्या काळात जनजागृती व दक्षता या शस्त्रांचा वापर करुन पुर परिस्थिती आणि कोरोनावर मात करता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी (दि.४) आयोजित पुर परिस्थतीत शोध व बचावकार्य प्रशिक्षण कार्यक्र मात मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, राज्य आपत्ती दल नागपूर तुकडी क्र मांक-१ चे टिम कमांडर प्र. सहायक समादेश सुरेश कराळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे, तहसीलदार राजेश भांडारकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी, यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पुर परिस्थिती असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन कार्य करावे. शोध व बचाव कामात जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांच्या रंगीत तालमेचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तींवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. या वर्षी जिल्हयातील जलाशय, धरण व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुर परिस्थीतीचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी, जिल्ह्यातील नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणे गरजेचे आहे. त्याकरिता नियुक्त केलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहून पुर परिस्थीतीची माहिती तात्काळ वरिष्ठांना देणे आवश्यक आहे. आपत्तीच्या वेळेस नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती नसल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे प्रतिसाद समाजापुढे येतील व पुर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानी कमी करण्यास मदत होईल. कोरोनावर प्रशासन आणि नागरिकांनी मिळून मात करणे शक्य होईल. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करु न दक्षता घेणे महत्वाचे आहेअसे त्यांनी सांगितले.याप्रसंगी कराळे यांनी, सजग नागरिक हा सुरक्षित नागरिक असतो असे सांगून पुराचे प्रकार, पुर येण्याची कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पुर्व सूचना, हवामान खात्याचे अंदाज इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली. शोध व बचाव कार्य करताना घेण्यात येणाºया आवश्यक दक्षतेच्या संदर्भात अनुभव सांगितले. तसेच घरगुती टाकाऊ वस्तुपासून फ्लोटींग डिव्हाईस तयार करून प्रात्यक्षिक दाखविले.खंडबंदा जलाशय येथे रंगीत तालिमप्रशिक्षण कार्यक्र म संपल्यावर तालुक्यातील खडबंदा जलाशय येथे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्याना रंगीत तालमेतून प्रशिक्षण देण्यात आले. खडबंदा जलाशयातील पाण्यात रबर बोट व इंजिनचे प्रशिक्षण, शोध व बचाव करताना पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणे, पाण्याच्या प्रवाहात बोटीचे प्रयोग आदिंचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात पूर परिस्थितीत कार्य करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे शोध व बचाव दल, अग्निशमन विभागातील अधिकारी छबीलाल पटले व कर्मचारी, तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य आशीष चव्हाण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शाखेतील दीपक परिहार, महेश वंजारी, यादव फरकुंडे आदि या प्रशिक्षण कार्यक्र मात झाले सहभागी होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी