शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:19 IST

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि.३) दुपारी भरउन्हात सुमारे तीन तासापर्यंत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देतहसीलदार विनोद मेश्राम यांना दिले निवेदन : मागण्या मंजूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि.३) दुपारी भरउन्हात सुमारे तीन तासापर्यंत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.सोमवारी सकाळी सुमारे १२ वाजतापासून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर, राकाँचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, जि.प.सदस्य किशोर तरोणे,रतिराम राणे, राकेश लंजे, उध्दव मेहेंदळे, हिरालाल शेंडे, शिशुकला हलमारे, चित्ररेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर, योगेश नाकाडे, आर.के. जांभुळकर, शालीक हातझाडे, अजय पाऊलझगडे, निलकंठ कुंभरे, दीपक रहेले, मनोहर शहारे, दीपक सोनवाने व कार्यकर्ते उपस्थित होते.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विविध समस्या असून शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शासनाने याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचचले आहे.यावेळी तब्बल १५ विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यात उन्हाळी धानपिकांना प्रति क्विंटल ५०० प्रमाणे बोनस द्यावे, सरसकट कर्जमाफी करावी, मग्रारोहयो योजनेची कामे सुरु करावी, शासनाच्या १८ आॅगस्ट २०१८ च्या शासन निर्णयातील ग्रामपंचायतींची रोहयो ५ लक्ष मर्यादा रद्द करुन २५ लक्ष करावी, ग्रा.पं.च्या कुशल कामांची राशी त्वरित अदा करावी, शेतीसाठी कृषी पंपांचे वीज बिल माफ करुन नवीन वीज कनेक्शन द्यावे, पंतप्रधान पिकविमा दाव्यांचा त्वरित निपटारा करावा, पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करावी, घरगुती वीज देयकातील वीज शुल्क माफ करावे, मासेमारी तलावांची लिज माफ करावी, झाशीनगर उपसा सिंचन योजना त्वरित सुरु करावी, लघू व मध्यम तलावातील गाळ काढावे, कालव्यांची दुरुस्ती करावी, प्रलंबित वनजमिनीचे पट्टे तात्काळ निकाली काढावे व खतांची दरवाढ मागे घ्यावी या मागण्यांचा समावेश आहे.