शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

समृद्ध महाराष्ट्र ‘जनकल्याण’ फसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:32 AM

महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकेवळ २६ टक्के कामे : अमृत कुंड, शेततळी, वृक्षारोपणाचा अभाव

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे केवळ २६ टक्के कामे झाल्याने समृद्ध महाराष्ट्रात ‘जनकल्याण’ फसल्याचे चित्र आहे.राजस्थान व मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ सुरू करण्याचा निर्णय आॅक्टोबर २०१६ मध्ये राज्य सरकारने घेतला. या योजनेतून अहिल्यादेवी सिंचन विहिरी, अमृत कुंड शेततळी, भूसंजीवनी वर्मी कंपोस्टिंग, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव, तलाव व जल संरक्षणाहस ११ सूत्री कामांना पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी योजनेची घोषणा केली. यासाठी १० कोटी रूपयांचा निधीची तरतूद केली होती. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलविणे, शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट वाढविणे हा उद्देश होता.या योजनेंतर्गत निर्मल व स्वच्छ बनवायचे होते. सरकारतर्फे ग्रामीण भागाची स्थिती सुधारण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर ही योजना सुरू करण्यात आली. योजनेंर्गत होणाऱ्या कामांसाठी गोंदिया जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचयातींनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. ११ सूत्री कामांसाठी ७५ हजार ८७१ अर्ज आले होते. यातील ७१ हजार ४८० अर्जांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. यातील १९ हजार ७७७ कामे सुरू आहेत. तर १२ हजार ३३ कामी पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक काम समृद्ध गाव तलावांचे झाले आहेत. ४६१ लोकांकडून शेततळ्यासाठी अर्ज करण्यात आले होते. परंतु ४४५ मंजुरी मिळाली आहे. २५० कामे सुरू असून १३१ कामे (५४.२३ टक्के) पूर्ण झाले आहेत.जिल्ह्यात एकही अमृत कुंड शेततळी नाही‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना’ च्या ११ सुत्री कामांमध्ये अमृत कुंड शेततळीसाठी २६ अर्ज आले होते. यातील ४ अर्ज मंजूर करण्यात आले. परंतु यातील एकही काम करण्यात आले नाही. नंदनवन वृक्षारोपण योजनेसाठी १०८ अर्ज मंजूर करुनही एकही काम पूर्ण झाले नाही. १०४ कामे सुरू आहेत. अहिल्यादेवी सिंचन विहिरींसाठी ६९२ अर्ज आले होते. ५९६ अर्जाला प्रशासकीय व तांत्रीक मंजुरी देण्यात आली. ३४० कामे सुरू आहेत. १११ विहिरी तयार झाल्या आहेत. भूसंजीवनी कर्मी कंपोस्टिंगच्या२७९ पैकी १०८ कामे सुरू आहेत.१११ कामे पूर्ण झाले आहेत. भूसंजीवनी नापेड कंपोस्टिंगचे २५१ पैकी ३६ काम सुरू आहेत. तर ३० कामे पूर्ण झाले आहेत. समृद्ध गाव योजनेसाठी ५ हजार ४६६ अर्ज आले होते. ४ हजार ७०४ अर्जांना प्रशासकीय व तांत्रीक मान्यता मिळाली. ९९१ कामे पूर्ण झाले. तर १७५१ कामे सुरू आहेत.निर्मल शोषखड्ड्यांचे २३.८० टक्के कामया योजनेंतर्गत निर्मल शोषखड्ड्यांसाठी ३८ हजार ८९ अर्ज आले होते. यातील ३६ हजार ७ अर्जांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. यातील ९ हजार ६५ शोषखड्यांचे काम सुरू आहेत. तर ६ हजार ५४० (२३.८० टक्के ) शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहेत. निर्मल शौचालयाचे ३० हजार ३६५ अर्ज आले होते. यातील २९ हजार ८६ शौचालयांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. ८ हजार १२३ शौचालयाचे काम सुरू आहेत.तर ४ हजार ११९ (२६.७५ टक्के ) काम पूर्ण झाले आहेत.