गोंदिया : येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया संथ गतीने होत आहे. जानेवारी महिन्यात आलेल्या इंडियन मेडीकल कौन्सिलच्या तपासणी चमूने अनेक तृट्या काढल्यामुळे गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालय अधांतरी आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही.गोंदिया जिल्हावासीयांसाठी वैद्यकीय महाविद्यालय महत्वपूर्ण झाले आहे . या वैद्यकीय महाविद्यालयावर राष्ट्रवादी व काँग्रेसने राजकारण केले. आता भाजप आपली पोळी भाजून घेत आहे. परंतु आजही वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा अजूनही स्पष्ट झाला नाही. आताही गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यास अनेक अडचणी येत आहेत.इंडियन मेडीकल कौन्सिलच्या वेगवेगळ्या दोन चमूने गोंदियाचा दौरा केला. केटीएस, बाई गंगाबाई महिला रूग्णालय व प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण केले. दोन्ही चमूंनी दोन्ही वेळा अनेक तृट्या काढल्या.या तृट्या स्थानीक स्तरावर दूर करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात आले. दुसरी वेळी आलेल्या चमूने नवी दिल्लीत केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाला जो अहवाल सादर केला त्यानुसार सेक्शन कक्षात मृतदेह ठेवण्यासााठी टँक नाही, एक्स्ट्रालॉजी करीता स्टेज नाही, ओठा नाही अश्या प्रकारच्या अनेक तृट्या काढण्यात आल्या. क्षुल्लक-क्षुल्लक ५० तृट्या आढळल्या असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.इंडियन मेडीकल कौंसिलची एक चमू फेब्रुवारी महिन्यात गोंदियात येणार आहे. हा तिसरा व अंतिम दौरा चमू करणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय अधांतरीच
By admin | Updated: February 3, 2015 22:56 IST