लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील ४४४ समूहांना ५ कोटी २१ लाख ९८ हजार रूपये विविध बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.यामाध्यमातून समूह गट विविध उपक्रम राबवित आहे.परंतु मेंडकी या गावातील मॉ दुर्गा या समूहाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.ऑगस्ट २०१७ ला समाविष्ट करून या योजनेची अमंलबजावणी करायला सुरूवात करण्यात आली. स्वयंसहायता गट तयार करुन ते आज प्रभाग संघ बनविण्यापर्यंत पोहचले आहे. विविध प्रकारे भांडवल उपलब्ध करून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू झाले.यामध्येच एक भांडवल म्हणजे समूहांना मिळणारे बँक कर्ज सडक-अर्जुनी तालुक्यातील आजपर्यंत ४४४ समूहांना ५ कोटी २१ लाख ९८ हजार रूपये विविध बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. यामधून समूह गट विविध उपक्रम राबवित आहे. या समूहातील अनुसाय वट्टी या महिलेने चक्क दीड एकर शेतीवर ड्रीप, मलचिंगवर सेंद्रिय शेती, टरबूजची लागवड करून अर्धा एकर शेतीवर शेततळे तयार करून त्यात मासेमारी करण्याचा व्यवसाय करणार आहे. यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून अडीच लाख रुपयांचे कर्जही घेतले आहे. त्यामुळे त्या आर्थिक विकासाच्या मार्गावर आहे.सदर समूहाला तालुका अभियान व्यवस्थापक लिलाधर लंजे, प्रभाग समन्वयक लिभाष घरडे, कृषी विभाग व्यवस्थापक दीपक निमकर, प्रभाग मत्स्य व्यवस्थापक देवेंद्र कापगते, पवन भांडारकर यांनी मार्गदर्शन केले.महिला सक्षमीकरणाबरोबर महिला कुटुंब आर्थिक उन्नती करण्याची विशेष आवश्यकता आहे. अभियानामुळे मला आर्थिक पाठबळ मिळाले. अशाप्रकारे प्रत्येक महिलेने बँकेकडून कर्ज घेऊन आपली शेती व शेती पूरक व्यवसाय करून कुटुंबाला मदत करावी.- अनुसया वट्टी, सदस्य स्वयं सहायता समूह
४४४ समूहांची ५ कोटी २२ लाखातून प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST
ऑगस्ट २०१७ ला समाविष्ट करून या योजनेची अमंलबजावणी करायला सुरूवात करण्यात आली. स्वयंसहायता गट तयार करुन ते आज प्रभाग संघ बनविण्यापर्यंत पोहचले आहे. विविध प्रकारे भांडवल उपलब्ध करून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू झाले. यामध्येच एक भांडवल म्हणजे समूहांना मिळणारे बँक कर्ज सडक-अर्जुनी तालुक्यातील आजपर्यंत ४४४ समूहांना ५ कोटी २१ लाख ९८ हजार रूपये विविध बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.
४४४ समूहांची ५ कोटी २२ लाखातून प्रगती
ठळक मुद्देसडक-अर्जुनी तालुक्यातील समूह : महिलांची आर्थिक विकासाकडे वाचटचाल