शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांची चांदी

By admin | Updated: October 13, 2014 23:23 IST

निवडणुका आल्या की अनेक ‘व्यावसायिक’ कार्यकर्त्यांची चांगलीच चांदी होते. त्यांचे एकूण कार्यचित्रच पालटून जाते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी व सर्वसामान्यांवर दुष्काळाचे सावट असले

राधेश्याम भेंडारकर -अर्जुनी/मोरगावनिवडणुका आल्या की अनेक ‘व्यावसायिक’ कार्यकर्त्यांची चांगलीच चांदी होते. त्यांचे एकूण कार्यचित्रच पालटून जाते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी व सर्वसामान्यांवर दुष्काळाचे सावट असले तरी निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडायला लागला आहे. त्यामुळे तूर्तास का होईना सर्वांना दिलासा मिळाला आहे. या लाभामुळे व्यावसायिक आणि कायकर्त्यांमध्ये सध्या आनंदी-आनंद दिसत आहे. निवडणुका म्हटल्या की प्रचार आलाच. प्रचारासाठी सभा, सभेत मोठ्या दिग्गजांची वर्णी लागते. प्रचारसभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते कंबर कसून काम करतात. मंडप, डेकोरेशन, हारतुरे, माईक व्यवस्था, प्रचार गाड्या, थंड बिसलरी बाटल्या, चहा-नास्ता, सभास्थळी टोप्या, झेंड्या, होर्डींग्स या सर्व साधनांची जमवाजमव करावी लागते. प्रचार सभेत मंचावर आपल्या उमेदवारांचे पाठबळ किती आहे, हे दाखविण्यासाठी, स्वागतासाठी पार्टीतर्फेच हारतुऱ्यांची व्यवस्था असते. स्वागत करणाऱ्या कार्यकर्त्यांची रिघ बघताना कदाचित उमेदवारांच्या मनात प्रश्न निर्माण होत असावे. ‘आमचेच हार-आमचेच तुरेस्वागत करण्याएवढे कार्यकर्तेकुठून आलेत बरे, यातील किती खोटे किती खरे!’या सर्व धामधुमीमध्ये एरवी एक कटींग चहाच्या खर्चासाठी हात मागे करणारा उमेदवार जणू दिलदारच बनतो. वारेमाप पैशाची उधळण, हार तुऱ्यांमुळे फूल विक्रेत्यांची चांदीच चांदी असते. प्रचारासाठी महिन्यापूर्वीपासून मोटारगाड्यांची बुकींग करावी लागते. यामुळे अन्य लोकांची अनेकदा गाड्यांच्या कमतरतेने गोची होते. निवडणुकीचा प्रचार करताना कार्यकर्ते तन, मन (धन सोडून) कामाला लागतात. धन उमेदवारालाच लावावे लागते. उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पोट असते. त्यांच्या पोटासाठी जेवण, चहा, पान, शितपेय यांची व्यवस्था उमेदवार करतोच. भोजनालय, शितपेय, विक्रेते, चहापान टपरीवाले, मंडप डेकोरेशन, पक्षाचे प्रचार साहित्य विक्रेते, मुद्रणालये, पेट्रोल, डिजेल पंप यांना सध्या सुगीचे दिवस असल्याने प्रत्येकाची चांदी झाली आहे. कार्यकर्त्यांना जसे अन्नपाणी पाहिजे तसेच प्रचारातील मोटार गाड्यांना पेट्रोल डिझेलची गरज भासते. अर्थात पेट्रोल पंप मालकांची चांदी, गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हरची व गाडी मालकाची चांदी, प्रचार करताना कार्यकर्त्यांची कमी असल्यास गाडीत कार्यकर्ते म्हणून दाखविण्यासाठी वापर होणाऱ्या बेरोजगार युवकांची चांदी, प्रचार सभेत गर्दी दाखविण्यासाठी असलेल्या महिलांची चांदी, रोजीने कार्यकर्त्यांची जमवाजमव करणाऱ्या ठेकेदारांची चांदी, असे चित्र गेली १५ दिवस सर्वत्र दिसत होते. त्यामुळे पूर्वीचे निवडणुकीचीचे चित्र मागे पडून त्यात बदल झाल्यास ती अशी राहील. ‘आई-बाई अक्का, कुठेही मारा शिक्का, १०० रुपयांचा हिशेब पक्का’लाडक्या उमेदवाराचा प्रचार करून रात्री दमल्या-भागलेल्या जीवांना जेवणापूर्वी पौष्टिक सोमरसाचा ‘रिचार्ज’ करावाचा लागतो. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा जोर लागतो. सरळ सोमरसाची या काळात मागणी करण्यासाठी सांकेतिक भाषा वापरली जाते. मी छोटा रिचार्ज मारला, मी टॉपअप मारला तर काही फुल्ल रिचार्ज केला, असे मोबाईलच्या भाषेत बोलतात. अर्थात मद्यविक्री व्यावसायिकांचीही चांदी झाली.प्रचाराची माध्यमे बदलून त्यांची जागा आता सोशल मीडियाने घेतली. यामुळे मोबाईल कंपन्यांची चांदी. मतदार, कार्यकर्ते, बेरोजगार युवक, वाहन मालक, भोजनालय, शितपेय विक्रेते, पानठेले, चहा विक्रेते, पेट्रोल पंपधारक, मुद्रणालये, मंडप डेकोरेशनवाले, पक्षाचे साहित्य विक्रेते गेल्या १५ दिवसात एकच धून गाताना दिसत होते, आया सावन झुमके..