शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:34 IST

महाराष्ट्र शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांना बुधवारी (दि.१८) देण्यात आले. या वेळी आमदार गाणार व महासंघाचे पदाधिकारी यांच्यात प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा झाली.

ठळक मुद्देगाणार यांची दिले आश्वासन : महासंघाच्या पदाधिकाºयांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : महाराष्ट्र शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांना बुधवारी (दि.१८) देण्यात आले. या वेळी आमदार गाणार व महासंघाचे पदाधिकारी यांच्यात प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा झाली. दरम्यान प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन गाणार यांनी दिले.शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गोपीचंद कुकडे व गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र भड यांच्या नेतृत्वात शिक्षक आमदार गाणार यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद भैसारे, आत्राम, होले, संस्थाध्यक्ष व प्रयोगशाळा सहायक चरणदास उंदिरवाडे, संस्थाध्यक्ष राष्ट्रपाल वैद्य, राजेंद्र बडोले, एकनाथ बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.निवेदनात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रयोगशाळा सहायक व एल.ए.चा मुख्य मुद्दा चौथ्या वेतन आयोगापासून केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी न देता मोठी तफावत करण्यात आली. ती वेतनश्रेणी केंद्राप्रमाणे करुन सातवा वेतन आयोग केंद्राप्रमाणे जशाच्या तसा लागू करावा व वेतनातील फरक काढावा. सातव्या वेतन आयोगाच्या बक्षी समितीने वेतन त्रुटी सुधारण्यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा बोलाविणे आवश्यक असताना एकाही संघटनेला न बोलाविल्यामुळे संघटना राज्य शासनावर नाराज आहे. त्यामुळे सदर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांच्यासोबत बैठक लावण्यात यावी.आश्वासित सेवा प्रगती योजना रद्द करुन वरिष्ठ श्रेणी व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ पूर्वीप्रमाणेच देण्यात यावा. अशा प्रलंबित व अन्यायकारक समस्या व मागण्यांचे निवेदन देऊन सातवा वेतन आयोग लावण्यापूर्वी महासंघाच्या मागण्या मान्य कराव्या व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून, शिक्षक आ. गाणार यांनी शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव, बक्षी समितीला शासकीय बैठक त्वरित लावण्यासाठी पत्र लिहून पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे सांगितले. तसेच वेतनाचा गंभीर प्रश्न व इतरही प्रश्नांवर चर्चा करुन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास उग्र आंदोलन छेडणार-जगतापमहाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भरत जगताप यांनी दिवाळीपूर्वी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करु या अर्थमंत्र्यांच्या घोषणेवर आक्षेप घेताना म्हटले की, राज्य शासन व बक्षी समितीने कर्मचारी संघांना वेतन त्रुटी दूर करण्यासाठी शासकीय बैठका न लावता सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा फसवणी आहे. प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना शासन नियुक्त समन्वय समितीने सुचविलेल्या सुधारित शिक्षकेतर कर्मचारी बंद भरती त्वरित उठवावी व त्वरित भरती करावी. तसेच शासकीय बैठकीत महासंघाने सुचविलेल्या मागण्या मान्य करुन केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू न केल्यास राज्यभरातील हजारो कर्मचारी हिवाळी अधिवेशन व आझाद मैदानावर उग्र आंदोलन छेडणार. वेळ पडल्यास आमरण उपोषण करणार असा तिव्र इशारा राज्याध्यक्ष जगताप दिला.

टॅग्स :Nago Ganarनागो गाणारEducationशिक्षण