शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दरवाढीने गॅस सिलिंडरची जागा घेतली चुलीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. आठ ...

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमती १६५ रुपयांनी वाढल्या आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटल्याचे चित्र आहे.

गॅस सिलिंडरशिवाय स्वंयपाकघराची कल्पना करताच येत नाही. केंद्र सरकारनेसुध्दा धूर आणि चुलीपासून महिलांना मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर कमी असल्याने याचा अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीची जागा गॅस सिलिंडरने घेतली होती. यामुळे वृक्षतोडीलासुध्दा काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र मागील वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ४०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ९१० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ते आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे अनेकांनी गॅस सिलिंडरचा वापर बंद केला असून, पुन्हा चुलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटू लागल्याचे चित्र आहे.

...............

एकदा हजार रुपये दर करून टाका

वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोविडमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यातच आता केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. तर दुसरीकडे अनुदानातसुध्दा मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. गॅस सिलिंडरचे दर ९१० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींमध्ये संताप व्यक्त होत असून, एकदाचे गॅस सिलिंडरचे दर एक हजार रुपये करून टाका, अशा शब्दात गृहिणींनी संताप व्यक्त केला आहे.

................

कोट

कोविडमुळे अनेक कुटुंबांचा रोजगार हिरावला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलपाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे महिन्याचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. वाढती महागाई आणि दरवाढीने जगावे कसे हे कळेनासे झाले आहे.

- कविता मेंढे, गृहिणी

......................

अशी झाली गॅस सिलिंडरची दरवाढ

जानेवारी २०१९ : ७३८

जानेवारी २०२० : ७६०

जानेवारी २०२१ : ७४६

१ ऑगस्ट २०२१ - ८८६

१७ ऑगस्ट २०२१ : ९१०