शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

दरवाढीने गॅस सिलिंडरची जागा घेतली चुलीने; किंमत पोहोचली ९१० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 14:49 IST

Gondia News आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमती १६५ रुपयांनी वाढल्या आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआठ महिन्यांत १६५ रुपयांची दरवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क   

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमती १६५ रुपयांनी वाढल्या आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटल्याचे चित्र आहे. (Gas cylinder rate high )

गॅस सिलिंडरशिवाय स्वंयपाकघराची कल्पना करताच येत नाही. केंद्र सरकारनेसुध्दा धूर आणि चुलीपासून महिलांना मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर कमी असल्याने याचा अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीची जागा गॅस सिलिंडरने घेतली होती. यामुळे वृक्षतोडीलासुध्दा काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र मागील वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ४०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ९१० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ते आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे अनेकांनी गॅस सिलिंडरचा वापर बंद केला असून, पुन्हा चुलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटू लागल्याचे चित्र आहे.

एकदा हजार रुपये दर करून टाका

वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोविडमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यातच आता केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. तर दुसरीकडे अनुदानातसुध्दा मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. गॅस सिलिंडरचे दर ९१० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींमध्ये संताप व्यक्त होत असून, एकदाचे गॅस सिलिंडरचे दर एक हजार रुपये करून टाका, अशा शब्दात गृहिणींनी संताप व्यक्त केला आहे.

कोविडमुळे अनेक कुटुंबांचा रोजगार हिरावला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलपाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे महिन्याचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. वाढती महागाई आणि दरवाढीने जगावे कसे हे कळेनासे झाले आहे.

- कविता मेंढे, गृहिणी

 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर