गोंदिया : तीन मुख्य मागण्यांना घेऊन ग्रामीण भागातील डाकसेवकांनी १० मार्चपासून कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प पडली आहे. मागण्या पुर्ण होई पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा अखील भारतील ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघटना नागपूरच्या गोंदिया जिल्हा शाखेने घेतला आहे.ग्रामीण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा, डाकसेवकांना केंद्रिय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्या इत्यादी मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले. आठ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० ते ४० हजार रूपये वेतन दिले जाते. परंतु ग्रामीण भागातील डाकसेवकांना १२ तास काम करूनही फक्त ५ ते ६ हजार रूपये वेतनावर काम करावे लागते. डाकसेवकांचे हे शोषण होत असल्याने त्यांनी १० तारखेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील ४०० डाकसेवक या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. जेव्हा पर्यंत मागण्या पुर्ण होणार नाही तेव्हापर्यंत कामबंद आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा या कर्मचारी संघटनेने घेतला आहे. या आंदोलनामुळे पत्रव्यवहार ठप्प झाला आहे. पैश्याची देवाण-घेवाण बंद झाली आहे. आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष एम.पी. बेले, सचिव पी.पी. सिंगाडे करीत आहेत.
तीन दिवसांपासून डाकसेवा ठप्प
By admin | Updated: March 16, 2015 00:03 IST