लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबत घेऊन उपाययोजना करण्यासाठी संबधित विभागाला निर्देश दिले. तसेच दुष्काळ परिस्थितीचा त्वरित आढावा घेण्याचे निर्देश देवून शेतकºयांना सर्वपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले.जिल्ह्यात यावर्षी पाऊस वेळेवर व समाधानकारक न आल्याने मोठ्या प्रमाणात पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे धान पिकांवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात शेतकºयांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. या संदर्भात पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यात दौरा करून पीक परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच भाजपच्यावतीने त्यांना जिल्हा दुस्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.जिल्ह्यातील परिस्थिती बघता जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या नेतृत्वात पालकमंत्री बडोले यांना देण्यात आले होते. माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी आमदार भेरसिंह नागपूरे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर आदींच्या उपस्थितीत निवेदन देत दुष्काळाच्या विषयावर पदाधिकाºयांनी पालकमंत्री बडोले यांच्या सोबत चर्चा करून याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करवून देण्याची मागणी केली होती.दरम्यान बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री बडोले यांनी जिल्ह्याची सर्व परिस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांच्या समस्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सर्वेक्षण करून पंचनामा तयार करावे. तसेच ज्यांनी पेरणी केलेली नाही त्यांच्या शेतात मूग, हरभरा, उडीद सारख्या कडधान्याचे बियाणे उपलब्ध करून लागवड करण्यासंदर्भात कृषी विभागाला निर्देश दिले. यासोबतच जिल्ह्यात पाणीसाठा कमी असल्याने भविष्य कालीन उपाययोजनांबाबतीत संबंधित यंत्रणेला निर्देशित केले. तसेच पालकमंत्र्यांंना यांसदर्भात आढावा बैठक घेऊन माहिती घेण्यास सांगितले. शेतकºयांना मदत करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांनी याआधीच जिल्ह्यातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतक-यांना धीर दिला आहे. पीक विम्यातही शेतकºयांना प्रोत्साहित करण्यात आले होते. या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:19 IST
गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली.
दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी सकारात्मक
ठळक मुद्देपालमंत्र्यांनी दिली माहिती : बैठकीत मांडली जिल्ह्याची परिस्थिती