पाटीलटोला ते नवेगाव रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST2021-06-17T04:20:22+5:302021-06-17T04:20:22+5:30

पाटीलटोला येथे रेल्वेची झांझरिया कंपनी असून तेथे कामासाठी बरेच मजूर या मार्गाने ये-जा करतात. पाटीलटोला ते नवेगाव रस्ता समोर ...

Poor condition of Patiltola to Navegaon road | पाटीलटोला ते नवेगाव रस्त्याची दुरवस्था

पाटीलटोला ते नवेगाव रस्त्याची दुरवस्था

पाटीलटोला येथे रेल्वेची झांझरिया कंपनी असून तेथे कामासाठी बरेच मजूर या मार्गाने ये-जा करतात. पाटीलटोला ते नवेगाव रस्ता समोर महामार्गाला जोडला आहे. त्यामुळे येथून गोंदिया ते नागपूरकडे बस धावते. परंतु, पावसाळ्याला सुरुवात होताच रस्त्यावरील खड्ड्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचते. यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत अपघाताची शक्यता बळावली आहे. नवेगाव येथे रस्त्याला लागूनच संतोषी माता मंदिर आहे. त्यामुळे अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी याच मार्गाने जातात. या रस्त्याने नेहमीच ट्रक व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. तसेच घोगरा व पाटीलटोला येथील युवक तिरोडा येथील अदानी कंपनीत कामावर जातात. आता या रस्त्याने पायी तसेच दुचाकी वाहनाने जाणेही धोक्याचे झाले आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Poor condition of Patiltola to Navegaon road