शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांसाठी मतदान केंद्र झाले ‘फायनल’, २८ अन् ३० एप्रिल असे दोन टप्पे

By कपिल केकत | Updated: April 23, 2023 18:42 IST

गोंदिया जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे.

गोंदिया : जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यातील देवरी बाजार समिती अविरोध झाल्याने आता उरलेल्या सहा बाजार समित्यांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यातील चार बाजार समितींसाठी शुक्रवारी (दि. २८) रोजी तर दोन बाजार समितींसाठी रविवारी (दि. ३०) मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्र ठरविण्यात आले असून, त्यानुसार तयारी सुरू झाली आहे.

राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहेत. यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला वेळ असून, बाजार समित्यांची निवडणूक तोंडावर आली आहे. जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, आमगाव व देवरी या सात बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. यातील देवरी बाजार समितीची निवडणूक अविरोध आटोपली असल्यामुळे आता उरलेल्या सहा बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीला घेऊन उमेदवार व नेते मंडळी प्रचारात व्यस्त झाली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीला घेऊन निबंधक कार्यालय सुद्धा व्यस्त आहे. निवडणुकीला निबंधक कार्यालयाकडून मतदान केंद्रांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली असून, निबंधक कार्यालयाकडून तशी तयारी सुरू झाली आहे.

असे राहणार मतदान केंद्र

  • - गोंदिया बाजार समिती : गोंदिया बाजार समितीत ३८६१ मतदार असून, त्यांच्यासाठी शहरातील मनोहरभाई पटेल म्युनिसिपल हायस्कूल, दवनीवाडा येथील जिल्हा परिषद शाळा व रावणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - गोरेगाव बाजार समिती : गोरेगाव बाजार समितीत १२७८ मतदार असून, त्यांच्यासाठी शहीद जान्या-तिम्या हायस्कूलमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - तिरोडा बाजार समिती : तिरोडा बाजार समितीत १९३० मतदार असून, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - आमगाव बाजार समिती : आमगाव बाजार समितीत १६३२ मतदार असून, त्यांच्यासाठी आमगाव येथील जिल्हा परिषद शाळा, ग्राम ठाणा येथील जिल्हा परिषद शाळा, ग्राम कालीमाटी येथील जिल्हा परिषद शाळा व ग्राम अंजोरा येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - अर्जुनी-मोरगाव बाजार समिती : अर्जुनी-मोरगाव बाजार समितीत १४३२ मतदार असून, त्यांच्यासाठी अर्जुनी-मोरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल, नवेगावबांध येथील जिल्हा परिषद हायस्कूल, ग्राम महागाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व ग्राम केशोरी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - सडक-अर्जुनी बाजार समिती : सडक-अर्जुनी बाजार समितीत १०७८ मतदार असून, त्यांच्यासाठी सडक-अर्जुनी येथीलच त्रिवेणी हायस्कूल व ज्योती कन्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.

 असे होणार मतदान- देवरी येथील बाजार समितीची निवडणूक अविरोध झाल्यामुळे आता सहा बाजार समित्यांसाठी निवडणूक घेतली जात आहे. यामध्ये गोंदिया, आमगाव, तिरोडा व अर्जुनी-मोरगाव बाजार समितीसाठी शुक्रवारी (दि. २८) मतदान होणार असून, शनिवारी (दि. २९) मतमोजणी होणार आहे. तर गोरेगाव व सडक-अर्जुनी बाजार समितीसाठी रविवारी (दि. ३०) मतदान होणार असून, मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. प्रचाराला झाली सुरुवात- बाजार समिती मतदानासाठी आता चार-पाच दिवसांचा कालावधी उरला असून, उमेदवार प्रचाराला लागले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढली जात नसून पॅनल तयार करून उतरविले जातात. यामुळे राजकीय पक्षांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी नेते मंडळीसुद्धा मैदानात उतरली आहेत. मतदान केंद्र, संस्था व मतदारनिहाय आकडेवारीचा तक्ताबाजार समिती- सहकारी संस्था (केंद्र -मतदार)- ग्रापं.संघ (केंद्र -मतदार)- व्यापारी-अडते (केंद्र -मतदार)- हमाल-तोलारी (केंद्र -मतदार)

  1. गोदिंया - ३-७९४/३-१०८५/३-१२०२/२-७८०
  2. गोरेगाव- २-६४६/२-५१४/१-५५/१-६३
  3. तिरोडा- २-८४०/२-८४०/१-१३३/१-११७
  4. आमगाव- ४-६०३/४-४८७/१-२४५/१-२९७
  5. अर्जुनी-मोरगाव- ४-४७५/४-६४७/१-८०/१२३०
  6. सडक-अर्जुनी- १-३२१/१-५६१/१-१८१/१-१५
टॅग्स :gondiya-acगोंदियाElectionनिवडणूक