यंत्रणा सज्ज : दीड हजार कर्मचारी अधिकाऱ्यांचा बंदोबस्तगोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह सात ग्राम पंचायतीत पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (दि.२५) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचारीही संबंधित मतदान केंद्रांवर रवाना झाले. सुरक्षा बंदोबस्तासाठी १४१३ पोलीस कर्मचारी तर १२३ अधिकारी व ७५ वनरक्षक, वनपाल तैनात केले आहेत.ग्राम पंचायतच्या निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गोंदिया पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. गुरूवारच्या सायंकाळी ५ वाजता ग्राम पंचायतीच्या प्रचारतोफा थंडावल्या. आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये कार्यकाळ संपणाऱ्या १८१ ग्राम पंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. त्यासाठी ३०७५ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत कोणताही वादविवाह होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आता ग्राम पंचायतीच्या निवडणूक होत असल्याने गावागावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सात ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुका याच दिवशी होत आहेत. १८१ ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक व ११ ग्राम पंचायतच्या प्रभागांमध्ये पोटनिवडणुकांसाठी ५४१ बूथवर मतदान होणार आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षकांसह एक अप्पर पोलीस अधीक्षक, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, १०२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ९६३ पोलीस कर्मचारी, ७५ वनरक्षक, वनपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय शांतता राखण्यासाठी पोलीस विभागाला मदत करण्यासाठी ४०० पुरूष गृहरक्षक व ५० महिला गृहरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांना संबंधित पोलीस ठाण्यात एक दिवस आधी पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)नक्षलग्रस्त भागात ३ पर्यंत मतदानगोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ पर्यंत मतदान करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांनी घातपात घडवू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जंगलात सी-६० पार्ट्या नक्षलवाद्यांचा शोध घेत असून निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत आहे. आचारसंहितेचा गुन्हा दाखलमतदारांना कढई वाटप करताना मिळालेल्या उमेदवाराविरूद्ध गंगाझरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गंगाझरी येथील वॉर्ड क्र. १ व २ मध्ये उभे असलेले भगत मोतीराम लिल्हारे (५२) यांचे निवडणूक चिन्ह कढई असल्याने तचे मतदारांना कढई वाटप करताना आढळून आले. बंगलाटोली टिकायतपूर येथे गुरूवारच्या रात्री १० वाजतादरम्यान कढई वाटप करताना आढळले. निवडणूक निर्णय अधिकारी गोंदिया सोमनाथ बाबूराव माळी यांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून मोटारसायकल एमएच ३५, जे ८७१५, नऊ नग जर्मन कढई, २१ नग मिठाचे पॅकेट, ५० नग बेसन पुडे असा माल जप्त करण्यात आला.ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीरजिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ११ ग्रामपंचायतीमधील प्रभागांच्या पोटनिवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी २५ जुलै रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रासाठी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
१८१ ग्रा.पं.मध्ये आज मतदान
By admin | Updated: July 25, 2015 01:38 IST