लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भरधाव मोटारसायकलने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. यात मोटारसायकल चालक पोलीस कर्मचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१३) सकाळी ७ वाजताच्या सुमारास गोंदिया-अर्जुनी मोरगाव मार्गावरील नवेगावबांधजवळ घडली. रामकृष्ण सदाशिव कोडापे (३४) रा. राजीटोला असे अपघात ठार झालेल्या पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार नागपूर येथे भारतीय राखीव पोलीस बटालियन क्र. १५ मध्ये राजीटोला येथील रहिवासी रामकृष्ण सदाशिव कोडापे (३४) हे २०१० पासून कार्यरत होते. बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आपल्या होंडा ग्लॅमर मोटारसायकल क्रमांक एमएच ३५, एक्स ६०१२ ने आपल्या स्वगावी राजीटोला येथे दोन महिन्याच्या मुलगा, पत्नी व आई-वडीलांना भेटायला जाण्यासाठी नागपूरवरुन येत होता. दरम्यान नवेगावबांध चिचगड मार्गावरील घटाली चढावावर रस्त्याच्या कडेला असलेल्या मोहफुलाच्या झाडाला त्याच्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, डोक्यावर हेल्मेट घातले असताना देखील डोक्याला गंभीर दुखापत होवून रामकृष्ण जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच ये-जा करणाºया वाहन चालकांनी व कोहलगाव येथील गावकºयांनी अपघातस्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती नवेगावबांध पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पोलीस हवालदार नामदेव बनकर, पोलीस नाईक बापू येरणे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे पाठविला. मृतक जवान रामकृष्ण यांच्या मागे पत्नी, दोन महिन्याचा मुलगा, आई-वडील, बहिण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
मोटारसायकल अपघातात पोलीस कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:40 IST
भरधाव मोटारसायकलने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. यात मोटारसायकल चालक पोलीस कर्मचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मोटारसायकल अपघातात पोलीस कर्मचारी ठार
ठळक मुद्देगोंदिया-अर्जुनी मोरगाव मार्गावरील घटना