शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

तिरोडा-साकोली रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:04 IST

वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता उखडलेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास : लोकप्रतिनिधींची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : तिरोडा-साकोली हा मार्ग महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा आहे. रस्त्यांचे काम बांपेवाडापासून उमरझरीपर्यंत सुरु आहे. वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता उखडलेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.साकोली येथे ग्रंथालयशास्त्र महाविद्यालय, शासकीय पॉलीटेक्नीक कॉलेज, इंजिनियर कॉलेज, सायन्स कॉलेज या प्रकारचे शैक्षणिक संस्थान असल्याने तिरोडा परिसरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दररोज प्रवास करतात.तिरोडा-साकोली मार्गाची दुर्दशा झाली असल्याने विद्यार्थ्याना कॉलेजच्या वेळेवर पोहचता येत नाही. तिरोडा परिसरात रस्ते दुरुस्तीचा अनुशेष वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणारे बहुतांश रस्ते खड्यात गेले आहेत.खड्डेमय रस्त्याच्या त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.या रस्त्याने अनेक वाहन चालकांचा बळी घेतला आहे. मात्र अद्यापही याची दखल घेण्यात आली नाही. रस्ते दुरुस्ती कार्यावरुन ग्रामपंचायतच्या ग्रामसभा गाजत आहेत.गावकरी लोकप्रतिनिधींना जाब विचारत आहेत.परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही.निधी मंजुरीचे नेमके काम कुठे अडले आहे हे सामान्य जनतेला कळायला मार्ग नाही.साकोली तिरोडा रस्ता त्रासदायक झाला आहे. प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन रस्ता दुरुस्ती करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक