शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

साहित्याने माणूस अंतरंग जाणू शकतो

By admin | Updated: January 26, 2017 01:41 IST

साहित्याने माणसाला माणुसकी दिली. विज्ञानाने माणसाला ज्ञान दिले. विज्ञानाने माणूस अंतरीक्ष

बंडोपंत बोढेकर : ‘विज्ञान आणि साहित्य’ विषयावरील व्याख्यान अर्जुनी मोरगाव : साहित्याने माणसाला माणुसकी दिली. विज्ञानाने माणसाला ज्ञान दिले. विज्ञानाने माणूस अंतरीक्ष जाणू शकतो. साहित्याने माणूस अंतरंग जाणू शकतो. आपण अंतरंग साहित्यातून व्यक्त करु शकतो. साहित्यात व्यक्त झालेलं लेखकांचे अंतरंग, मनातली खदखद, भावना, तरंग संवेदनशीलतेने वाचक टिपू शकतो. साहित्यातून झोपी गेलेला समाज, विकृत झालेला समाजसुद्धा देशासाठी उभा राहू शकतो. मानवातील कुप्रवृत्ती, कलह, व्यसनापासून मुक्ती मिळते, असे प्रतिपादन विज्ञान व साहित्याचे अभ्यासक बंडोपंत बोढेकर, गडचिरोली यांनी केले. ते गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या विज्ञान आणि साहित्य या विषयावरील मुलाखतीत ते बोलत होते. देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारत २०२० पर्यंत महासत्ता होईल, असं म्हटलं होतं. आजचा युवक हा विश्वाचा नकाशा. गावावरुन देशाची परीक्षा, असं म्हटलं जाते. राष्ट्रसंतांनीसुद्धा गावाची संकल्पना त्या कालखंडात वर्णिली होती. गावातील प्रत्येक घर उद्योगी, तेथील प्रत्येक व्यक्ती गावातील सर्वांगिण प्रगतीचा तंत्रज्ञ असतो. राष्ट्रसंतांची खंजेरी वाजते. त्यांचे भजन कानावर येतात. त्यांनी विज्ञान सांगितला आहे. ते विज्ञानवादी होते. तुकडोजी महाराज हे कालचे संत वाटत नाही तर ते आजचे असल्याचे वाटते. विज्ञानाला भावना नसतात आणि साहित्य भावनेवर आधारलेले असते. मनाचं विचार साहित्य. मेंदूचं विचार विज्ञान. साहित्य आणि विज्ञानाचा निर्माता माणूस आहे. विज्ञानात माणसाची चूक सहन केली जात नाही. विज्ञानाची शिकवणूक म्हणजे काटेकोरपणा. विज्ञान आणि साहित्य हे दोन्ही मानवाच्या प्रगतीसाठी आहेत. वैज्ञानिक दृष्टी म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकारणे होय. साहित्याचा अर्थ तुमच्या मनातला वाईट विचारसुद्धा दखलपात्र साहित्यात व्यक्त करु शकता. मात्र आपण जीवनात तसे वागले तर त्याचा निषेध होईल. जीवन कसं आहे, ते कसं असावे, हा संदेश देण्यासाठी साहित्य आहे. माणसाचा माणूसपण जागृत करणे म्हणजे प्रबोधन. विज्ञान हे ज्ञान देऊ शकतं, प्रबोधन नव्हे. मोबाईल हा विज्ञानाचा आविष्कार आहे. विज्ञान हे साहित्यातून आविष्कारीत झाले आहे. माणसानं कुठल्याही गोष्टीत विज्ञानवाद बघावं. प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. मात्र दृष्टी तशी असली पाहिजे. पहिला वैज्ञानिक हा शेतकरी आहे. एका बियाण्यांपासून अनेक बियाणे तयार करण्याचे काम त्याने केले आहे. विज्ञानाने विद्यार्थ्यांच्या जाणीवा विकसित होतात, त्यातूनच प्रगती होते. लेखकसुद्धा विज्ञानवादी असावेत. अंधश्रद्धा नको, अंधश्रद्धेचे बालमनावर विपरित परिणाम होतात. प्रयोग कृतीतून घडले पाहिजेत. व्यसनाधिनतेमुळे युवकातील उदासीनता वाढली आहे. ती घालण्यासाठी विज्ञान अंगिकारला पाहिजे. स्वत:चा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. मानवी मनाच्या अवस्था सकारात्मक दृष्टीने स्वीकारल्या पाहिजे. मानवी जीवन उन्नत करण्यासाठी विज्ञान आणि साहित्याची सांगड घालणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)