लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आता सण-उत्सवाचे दिवस आले आहेत. हे उत्सव शांतता व सुव्यवस्थेने साजरे व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी पथसंचलन आयोजित करून शांततामय वातावरण व सुव्यवस्थेचे आवाहन करण्यात येत आहे.बोंडगावदेवी : पोलीस ठाणे अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येणाºया गावांमध्ये गणेशोत्सव, बकरी ईद यासारखे विविध धार्मिक व सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. उत्सवाप्रसंगी कायदा व सुव्यवस्था कायम राहून सर्वत्र शांततामय वातावरण निर्मिती व्हावी. वेळोवेळी पोलीस विभाग सामान्य जनतेच्या हितार्थ तत्पर आहे. उत्सव साजरे करताना परस्परांप्रती सलोखा प्रस्थापित करण्याचे आवाहन अर्जुनी-मोरगाव पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी केले.पोलीस विभागाच्या वतीने अर्जुनी-मोरगाव नगरात पोलीस दलाच्या बँड पथकासह काढण्यात आलेल्या पथसंचालन रॅली दरम्यान ते नगरातील जनतेशी संवाद साधताना बोलत होते.पोलीस विभागाच्या वतीने अर्जुनी-मोरगाव नगरातील सिंगलटोली, बाजार चौक, दुर्गा चौक, लाखांदूर मार्ग टी पाईट इत्यादी ठिकाणी पोलिसांचे पथसंचालन झाले. सर्व नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेची जाणीव करुन देण्यात आली. पोलीस पथसंचालनासह निघालेल्या रॅलीमध्ये तहसीलदार डी.सी. बोंबार्डे, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, केशोरीचे पोलीस उपनिरीक्षक कोळी, सी-६० चे पोलीस उपनिरीक्षक जठार, नवेगावबांधचे सहायक पोलीस निरीक्षक कुणघाटकर, अनिल कुंभरे उपस्थित होते.पथसंचालनात अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक माणिक खरकाटे, महेंद्र गोंडाणे, वाढई, परसराम सोनवाने, मेहर, भोयर, बोरकर, निकोडे, बाबा सिद्दिकी, मुळे, खोटेले, शिवणकर, कोरे व सर्व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.या वेळी पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे म्हणाले, येणाºया दिवसांत धार्मिक उत्सव साजरे करताना नागरिकांनी मनात कोणतीही भीती बाळगू नये. नगरातील सामान्य जनतेसोबत पोलीस विभाग आहे. शांतता व सुव्यवस्थेला गालबोट न लागता आनंदी वातावरणात सहभागी व्हावे. एकमेकांसह कटूता न दाखविता सलोखा कायम ठेवण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.नवेगावबांध : गणेशोत्सव, बकरी ईद व इतर सणांच्या अनुषंगाने शांतता व सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या वतीने दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली.सणाच्या कालावधीत नागरिकांमध्ये उत्साह असते. त्याचबरोबर काही असामाजिक प्रवृती देखील जनतेच्या आनंदात विरजन टाकण्याचे काम करीत असतात. अशा प्रवृत्तीवर पोलिसांबरोबर जागरुक नागरिकांचेदेखील बारीक लक्ष असणे गरजेचे असते. धार्मिक उत्सव कायद्याचे पालन करुन उत्साहात साजरे व्हावेत व असामाजिक तत्वावर नियंत्रणही असावे यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनात नवेगावबांध येथे दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली.त्यानंतर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत देखील सणांचे पावित्र्य टिकविण्याबाबद चर्चा करण्यात आली.सदर अभियानाकरिता एकूण नऊ अधिकारी आणि ९० कर्मचारी सहभागी झाले होते. ठाणेदार स्वप्नील उणवने व सहकाºयांनी सहकार्य केले.
पोलिसांच्या पथसंचलनातून शांतीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:01 IST
आता सण-उत्सवाचे दिवस आले आहेत. हे उत्सव शांतता व सुव्यवस्थेने साजरे व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी पथसंचलन आयोजित करून शांततामय वातावरण व सुव्यवस्थेचे आवाहन करण्यात येत आहे.
पोलिसांच्या पथसंचलनातून शांतीचा संदेश
ठळक मुद्देप्रशांत भस्मे : धार्मिक-सार्वजनिक उत्सवाप्रसंगी सलोखा ठेवा