शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

२७ कोटी रुपयांचे चुकारे आले पण पोर्टल अपडेटअभावी थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:50 IST

८ लाख ३२ हजार क्विंटल धान खरेदी : २४८६८ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल् जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे करण्यासाठी फेडरेशनला २७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. पण अद्यापही पोर्टल अपडेट झाले नसल्याने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला नाही. जोपर्यंत नवीन भीम पोर्टल अपडेट होत नाही तोपर्यंत चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त झाला तरी तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १८३ धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत २४८६८ शेतकऱ्यांनी ८ लाख ३२ हजार ८२३ क्विंटल धानाची विक्री केली आहे. विक्री केलेल्या एकूण धानाची किंमत ही १९१ कोटी ५४ लाख रुपये आहे. धान खरेदी सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण धानाच्या चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने १९१ कोटी ५४ लाख रुपयांचे चुकारे थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची ओरड वाढली होती. अनेक शेतकऱ्यांनी धानाची विक्री करून चुकारे जमा झाले की उधार उसनवारी फेडण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला पहिल्या टप्प्यात २७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. पण अद्यापही हे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वळते करण्यात आले नाहीत. चुकारे जमा करण्यासाठी शासनाकडून नवीन भीम पोर्टल तयार करण्यात आले आहे.

सध्या या पोर्टलचे अपडेट करण्याचे काम सुरू आहे. पोर्टल अपडेट करण्याचे काम पुन्हा आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे चुकारे बँक खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा दहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले. 

१ लाख ११ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय धानाची विक्री व बोनसचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ११ हजार १३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर जवळपास ७५ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी होणे शिल्लक आहे.

नोंदणीसाठी चार दिवस शिल्लक शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी शासनाने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपण्यास चारच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या चार दिवसांत नोंदणी करुन घ्यावी असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी कळविले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी