पटोलेंनी घेतली मृत वनमजुरांच्या कुटुंबीयांची भेट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:26 AM2021-04-14T04:26:05+5:302021-04-14T04:26:05+5:30

पांढरी : नवेगाव-नागझिरा प्रकल्पात लागलेली आग विझवताना मरण पावलेल्या थाटेझरी येथील राकेश मडावी (४०) , धानोरी रेखचंद राणे (४५) ...

Patole visits dead forest workers' families () | पटोलेंनी घेतली मृत वनमजुरांच्या कुटुंबीयांची भेट ()

पटोलेंनी घेतली मृत वनमजुरांच्या कुटुंबीयांची भेट ()

Next

पांढरी : नवेगाव-नागझिरा प्रकल्पात लागलेली आग विझवताना मरण पावलेल्या थाटेझरी येथील राकेश मडावी (४०) , धानोरी रेखचंद राणे (४५) व कोसमतोंडी येथील सचिन श्रीरंगे (२७) या हंगामी वनमजुरांच्या घरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

याप्रसंगी पटोले यांनी, मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत मिळाली असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यासाठी देखील आपण स्वतः प्रयत्नरत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जखमी वनमजुरांच्या तब्येतीबाबत डॉक्टर आणि प्रशासनाशी चर्चा करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार यावा या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून योग्य नियोजन करून आवश्यक ती सर्व खबरदारी देखील घेतली जावी अशा सूचना वनविभाग आणि प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत वनविभागाचे सर्व अधिकारी, विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) पूनम पाटे, तहसीलदार खोकले, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एन. डी. किरसान, मधुसूदन दोनोडे, दामोदर नेवारे, किरण हटवार, सरपंच महेंद्र पशिने, डॉ. के .जी. बोधनकर, पुष्पा खोटेले, ब्रम्हानंद मेश्राम, विलास कापगते, सरिता कापगते, रंजना भोई, शंकर मेंढे, किशोर शेंडे, मुंगुलमारे, राजू वाळवे आदी उपस्थित होते.

(फोटो ओळी : मृत मजुरांच्या कुटुंबीयांसोबत आमदार नाना पटोले व एन.डी. किरसान)

Web Title: Patole visits dead forest workers' families ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.