शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:51 AM

राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा,

ठळक मुद्देराजकुमार बडोले : तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा

ऑनलाईन लोकमत्नेगोंदिया : राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांना माहिती देताना येथे बोलत होते.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय आणि कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सदर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि महोत्सवाचे आयोजन देवरी येथे करण्यात आले आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले, पशु, दुग्ध व मत्ससंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थित २४ मार्च रोजी स्पर्धेचे उद्घाटन होईल. तर २५ मार्च रोजी कार्यक्र माची सांगता होईल.२३ मार्च रोजी दिव्यांग नियोजित स्थळी पोहचतील.२३ ते २५ मार्चदरम्यान चालणाऱ्या तीन दिवशीय राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेत सहभागी होणाºया दिव्यांगांसाठी सर्व सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. रेल्वेने येणाºयांसाठी गोंदिया रेल्वे स्टेशनातून तर एसटी बसने येणाºयांसाठी गोंदिया एसटी डेपोतून देवरी येथे पोहोचण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेच्या देवरी या ठिकाणी दिव्यांग क्रीडापटू तसेच त्यांच्यासोबत येणाºया सहकाºयांसाठी निवासाची, भोजनाची तसेच इतर सहाय्यकारी साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे बडोले यांनी सांगितले.जिल्हास्तरातून प्रथम प्राविण्य मिळवलेले अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर, मतिमंद तसेच बहुविकलांग खेळाडू गोळाफेक, उंचउडी, लांबउडी, वेट लिफ्टींग, जलतरण, धावणे, अ‍ॅथलेटिक्स, बुध्दीबळ, व्हिलचेअर अशा २६ प्रकारच्या क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत. राज्यभरातून सुमारे तीन हजार दिव्यांग खेळाडू या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतील. क्रीडा स्पर्धांसोबतच दिव्यांगत्वाचे त्वरित निदान होण्यासाठी शीघ्र हस्तक्षेप उपचार पध्दती, वाचा उपचार, भौतिक उपचार, निसर्गोपचार, संगीत उपचार तसेच व्यवसाय उपचार पध्दतीचे प्रशिक्षणही या वेळी दिले जाईल, असेही बडोले यांनी सांगितले.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. मात्र यावर्षी प्रथमच देवरीसारख्या नक्षलग्रस्त दुर्गम भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. शहरातील क्र ीडा स्पर्धांची दखल सर्वच घेतात. मात्र अतिदुर्गम भागात अशा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शहरी आणि खेडी यातील स्नेहसंबंध वृध्दींगत होतील असे वाटते. दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे कळविले आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा