शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

पोपटांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; 200 रुपये दराने होत होती विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 9:40 AM

शिरपूरनजीक रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनात पोपटांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे.

देवरी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील शिरपूरनजीक रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनात पोपटांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे. सविस्तर असे की, काल रविवारी (दि.09) रात्री 11 वाजेच्या सुमारास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे नेतृत्वात गस्तीवर असलेल्या देवरी पोलिसांच्या चमूने रायपूरकडून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा इंडिका (क्र. सीजी04- एचसी 0208 ला संशय आल्याने तपासणीसाठी रोखले.वाहनात गोणपाटामध्ये पॅकिंग केलेले ताराच्या पाच पिंजऱ्याविषयी वाहनचालक मोहम्मद असलम शेख फरीद (वय 35) राहणार न्यू राजेंद्रनगर रायपूर याला विचारणा केली असता त्याने स्थानिक आदिवासी लोकांकडून अवैधरीत्या पोपटांची खरेदी करून जादा भावाने नागपूरच्या बाजारात विक्री करीत असल्याची कबूली दिली. जप्त केलेल्या पाच पिजऱ्यातून 150 पोपट आढळून आले. हे पोपट 200 रुपये दराने विक्री करीत असल्याची माहिती आरोपींनी दिली. या कामात त्याला मदत करणारा मोहम्मद जाबीर मोहम्मद महेबूब राहणार संजयनगर रायपूर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.पशूपक्ष्यांची वाहतूक करून तस्करी करणे गैरकायदेशीर असल्याने पोलिसांनी आरोपींसह मुद्देमाल आणि वाहन जप्त करून देवरीच्या वनविभागातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. उल्लेखनीय म्हणजे अशा प्रकारची बेकायदेशीर पशूपक्ष्यांची तस्करी ही मोठी नवीन बाब नाही. वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमध्ये ठाणेदार बच्छाव यांचेसह हवालदार कावळे, राऊत, नायक उईके आणि बोहरे यांचा समावेश होता.