शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१४२ कोटी रुपयांची धान खरेदी अन् ५८ कोटी रुपयांचे चुकारे! १८ हजार ४२३ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री

By अंकुश गुंडावार | Updated: December 9, 2023 20:31 IST

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते.

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावरून यंदा दिवाळीनंतर धान खरेदीला सुरुवात झाल्याने त्याचा धान खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. फेडरेशनने आतापर्यंत १६७ केंद्रांवरून ६ लाख ५२ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत १४२ काेटी ३५ लाख ४७ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत केवळ ५८ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा धान खरेदी करणाऱ्या संस्थांना शासनाने नवीन निकष लावल्याने या संस्थांनी धान खरेदीवर बहिष्कार टाकला होता. परिणामी दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा दिवाळ सण अंधारात गेला. यानंतर लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने अटी शिथिल करून जुन्याच निकषानुसार धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून धान खरेदीला वेग आला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकूण १६७ धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत ६ लाख ५२ हजार १०६ क्विंटल धान खरेदी १८४२३ शेतकऱ्यांकडून केली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत १४२ कोटी ३५ लाख ४७ हजार रुपये असून यापैकी केवळ ५८ कोटी ६१ लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

९२ हजार ७२८ शेतकऱ्यांनी केली नोंदणीशासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना धानाची विक्री करता येत नाही. नोंदणी करण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९२ हजार ७२८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

तब्बल दहा दिवसांनंतर उघाडजिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारी (दि.९) ऊन निघाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPaddyभात