लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : येथील गावकऱ्यांना चूलबंद नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी पुढाकार घेवून जेसीबीच्या सहाय्याने नदीचे पात्र थोडे रुंद करुन पाणी पुरवठा करणाºया विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी टंचाईवर मात केली.सौंदड गावाची लोकसंख्या दहा हजारच्यावर आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतव्दारे चूलबंद नदीच्या पात्रालगत असलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत केला जातो. गावात एकुण ७०० खाजगी नळ कनेक्शनधारक असून चार हजार नागरिकांना दररोज २४ हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर नदी पात्रावर बंधारा नसल्याने दरवर्षी सौंदड येथील गावकºयांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा समस्येला तोंड द्यावे लागते. यावर्षी पाण्याची टंचाई भासायला नको या उद्देशाने युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी दोन हजार सिमेंटच्या बोºयामध्ये रेती भरुन बंधारा तयार करण्याचे नियोजन केले होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कलम १४४ लागू करण्यात आल्याने बंधारा बनविणे शक्य झाले नाही. तर यंदा नदीचे पात्र लवकरच कोरडे झाले. ही बाब युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या लक्षात येताच पाणी टंचाईवर मात करण्याकरिता ७०० फूट लांब व ८ ते ९ फूट रूंद नदीचे पात्र जेसीबीच्या सहाय्याने १० फुटाचे खोलीकरण करण्यात आले. यामुळे ग्रामपंचायत सौंदडने नदीपात्रात तयार केलेल्या विहिरीची पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनल सदस्यांनी वेळीच दखल घेत केलेल्या उपाययोजनेमुळे पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.यात जनशक्ती युवा पॅनल संस्थापक गायत्री इरले, रोशन शिवणकर, कपिल अग्रवाल, बिरला गणवीर, चंद्रकुमार बहेकार, राजू वैद्य, नंदकिशोर डोंगरवार, समाधान बडोले, हेमराज लाडे, नारायण सावरकर, सुनंदा वाढवे, मनोहर चांदेवार, वामन सुर्यवंशी, धर्मराज शेंडे, बापू भेंडारकर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.
नदीचे पात्र रुंद करुन केली पाणी टंचाईवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या सदस्यांनी पुढाकार घेवून जेसीबीच्या सहाय्याने नदीचे पात्र थोडे रुंद करुन पाणी पुरवठा करणाºया विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी टंचाईवर मात केली.
नदीचे पात्र रुंद करुन केली पाणी टंचाईवर मात
ठळक मुद्देयुवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनल : गावकऱ्यांची समस्या झाली दूर