आत्मविश्वासाने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:00 AM2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:31+5:30

गोंदिया येथील एक तरुण आपल्या मित्रांसह थायलंड येथे पर्यटनासाठी गेला होता. तो १७ मार्चला रायपूर मार्गे गोंदियाला परतला. मात्र त्याच्यासोबत गेलेले राजनांदगाव येथील दोन मित्र कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे २५ मार्चला जिल्हा आरोग्य विभागाने त्याला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करुन त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. यात त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

Overcome Kelly Corona with confidence | आत्मविश्वासाने केली कोरोनावर मात

आत्मविश्वासाने केली कोरोनावर मात

Next
ठळक मुद्दे२८ दिवसानंतर घेतला मोकळा श्वास : सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी शासन, प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक रुग्ण कोरोनावर मात करुन बरे देखील होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. गोंदिया येथील एका कोरोना बाधीत युवकाने आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन बाळगून कोरोनावर मात केली. त्याचा २८ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने घराबाहेर पडत मोकळा श्वास घेतला.
गोंदिया येथील एक तरुण आपल्या मित्रांसह थायलंड येथे पर्यटनासाठी गेला होता. तो १७ मार्चला रायपूर मार्गे गोंदियाला परतला. मात्र त्याच्यासोबत गेलेले राजनांदगाव येथील दोन मित्र कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे २५ मार्चला जिल्हा आरोग्य विभागाने त्याला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करुन त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. यात त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात १४ दिवस क्वारंटाईन करुन उपचार करण्यात आले. त्याने उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. त्याचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या स्वॅब नमुन्याच्या पुन्हा तिनदा चाचणी करण्यात आली. यात त्याचा चाचणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याला १० एप्रिलला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर त्याला १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याची व फिजीकल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना दिली. त्याने डॉक्टरांनी दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन केले. ९ मे ला त्याचा २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. यानंतर त्याने प्रथमच घराबाहेर पाऊल टाकत मोकळा श्वास घेतला.

२८ दिवसांनी जीवन जगण्याचा धडा शिकविला
मला कोरोनाची बाधा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मी घाबरलो नव्हतो. मात्र यामुळे आपल्या कुटुंबीयांना झालेला त्रास हे कधीच विसरु शकत नाही, मात्र अशाही स्थितीत माझ्या कुटुंबीयांनी मला नेहमीच धीर दिला. तर कोरोनावर मी निश्चित मात करणार हा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास बाळगला. त्यामुळे कोरोनावर मला मात करता आली. मात्र या २८ दिवसांनी मला जिवन जगण्याचा धडा शिकविला असे त्या कोरोनामुक्त झालेल्या तरुणांने सांगितले.

यांच्यापासून मिळाली ऊर्जा
रुग्णालयात असताना दररोज सकाळी उठून मेडिटेशन व प्राणायाम करायचा. दररोज गरम पाणी पिणे, दिवसभर सकारात्मक विचार करणे, आयसोलेशन कक्षात तो सामान्य व्यक्तीसारखाच राहायचा. रुग्णालयातील सर्वच वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यांचे मनोबल वाढविणारे विचार आणि सहकार्य त्याला मिळत राहिल्याने त्यालाही बरे वाटत होते. फोनवरून घरातील कुटुंबासोबतच शेजारी व नातेर्वाइंकांनी मनोबल वाढविण्यासाठी संपर्क करून सकारात्मक ऊर्जा देत राहिले.
टीव्ही आणि मोबाईल वेळ घालविण्यास मदत
कोरोनामुक्त झाल्याचा रिपोर्ट आल्यानंतर रुग्णालयातून सदर युवकाला ९ मे रोजी सुटी देण्यात आली. त्यानंतर १४ दिवस घरातच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टारांनी दिला होता. त्यामुळे या कालवधीत मी दिवसभर एका स्वंतत्र खोलीत राहत होतो. दिवसभर टीव्ही पाहणे आणि मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ घालवित होतो.

कोरोनाला घाबरून न जाता त्याचा कणखरपणे सामना करणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षा आणि काळजी घेणे, हे तर अत्यावश्यक आहेच. पण तरीही चुकून कोरोनाची लागण झालीच, तर डगमगून न जाता नियमांचे काटेकोर पालन केले तर कोरोनाचा लढा आपण सहज जिंकू सुद्धा शकतो.
- कोरोना मुक्त युवक.

Web Title: Overcome Kelly Corona with confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.